IPL 2020: लिलावाआधी KXIP फ्रेंचायझीने घेतला मोठा निणर्य, वसीम जाफर यांना दिली मोठी जबाबदारी
वसीम जाफर (Photo Credits: Getty Images)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) साठी खेळाडूंचा लिलाव थोड्याच वेळात कोलकातामध्ये सुरु होणार आहे. पण, त्याआधी किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) फ्रेंचायझीने संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून माजी भारतीय  आणि घरगुती खेळाडू वसीम जाफर (Wasim Jaffer) याची नियुक्ती केली आहे. फ्रॅंचायझीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत पुष्टी केली, जेथे कोचिंग स्टाफच्या इतर सदस्यांसह जाफरचे नाव नमूद केले गेले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला वसीम 150 रणजी सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आंध्र प्रदेश विरुद्ध विदर्भ संघातील ग्रुप एच्या वेळी त्याने मैदानात प्रवेश करत हा टप्पा गाठला. 41 वर्षीय वसीम प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20,000धावा पूर्ण करण्यापासून फक्त 853  धावा दूर आहे. (IPL 2020 Auction: आयपीएलकडून क्रिकेटपटूंच्या लिलावाची यादी जाहीर; विराट आणि रॉबिन उथप्पा सह 332 खेळाडूंवर लागणार बोली)

विदर्भाकडून रणजी ट्रॉफी खेळणार्‍या जाफरने 2000 ते 2008 दरम्यान भारतासाठी 31 टेस्ट सामन्यांमध्ये पाच शतकं आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने1944 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आठ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने भारताकडून फक्त दोन वनडे सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 254 सामने खेळून सुमारे 20,000 धावा केल्या आहेत. 2008 मध्ये लीगच्या उद्घाटन आवृत्तीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडून खेळलेत वसीम स्वत: आयपीएलचा भाग होता. यात वसीमने 19.16 च्या सहा सामन्यांत केवळ 115 धावा केल्या.

यंदाच्या आयपीएलआधी पंजाबफ्रेंचायझीने पूर्णपणे सुधारित सहाय्यक कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे मुख्य प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचा महान जॉन्टी रोड्स यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणाऱ्या कुंबळेने माईक हेसन यांची जागी घेतली. हेसनने  ऑगस्टमध्ये पंजाब फ्रॅंचायझी सोडण्याचा निर्णय घेतला होता.