IPL 2020: रविचंद्रन अश्विन याच्या Kings XI Punjab संघाबरोबरच्या भविष्याबाबत सह-मालक नेस वाडिया यांनी केले 'हे' मोठे विधान, वाचा सविस्तर
रविचंद्रन अश्विन, नेस वाडिया (Photo Credit: IANS)

टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आयपीएल (IPL)  2020 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) कडून खेळणार की नाही याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब फ्रँचायझीचे सह-मालक नेस वाडिया (Ness Wadia) यांनी स्पष्ट केले की आयपीएलच्या आगामी सत्रात अश्विन पंजाब संघाचाच भाग राहील. वाडियाने समोर येऊन स्पष्ट करत अश्विनच्या ट्रान्स्फरचे वृत्त फेटाळून लावले. नेस वाडिया म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघात अश्विनचे महत्त्व काय आहे हे आम्ही पाहिले आहे. तो एक उत्तम खेळाडू आहे आणि तो फक्त टीम इंडियाच नाही तर पंजाब संघाचादेखील एक महत्त्वाचा भाग आहे. तो पंजाब संघाचा अविभाज्य भाग आहे आणि तो आमच्याशी संबंधित असेल. त्याचा पंजाब संघाशी असलेला संबंध प्रत्येक बाबतीत खूप महत्वाचा आहे आणि त्याने हा संघ सोडावा असा प्रश्नच उद्भवत नाही.

2018 च्या आयपीएल दरम्यान अश्विनला पंजाब संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. संघाने त्यांच्या नेतृत्वात दोन आयपीएल खेळले आणि दोघांमध्ये प्लेऑफ गाठण्यात अपयशी ठरले, परंतु अश्विनने एक खेळाडू म्हणून चांगली कामगिरी केली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब अश्विनची दिल्ली कॅपिटल्सबरोबर अदलाबदल करू शकेल असे वृत्त बर्‍याच काळापासून सुरू आहे. आगामी आयपीएलसाठी खेळाडूंचे ट्रेड करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर आहे. 2014, पंजाबचा सर्वोत्तम हंगाम होता आणि यावेळी संघाने पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली, पण कोलकाताकडून पराभूत झाला आणि विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भाग झाले.

शिवाय, निकेतच पंजाबने टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे, तर कर्टनी वॉल्श संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक, जॉन्टी रोड्स क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, जॉर्ज बेली फलंदाजी प्रशिक्षक आणि सुनील जोशी हे संघाचे सहायक प्रशिक्षक असतील.