क्रिस गेल आणि एमएस धोनी (Photo Credit: Instagram)

क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग, इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 13वा हंगाम 19 सप्टेंबरपासून युएईत (UAE) खेळला जाणार आहे. 53 दिवस खेळल्या जाणाऱ्या या लीगचा अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. आयपीएलची (IPL) विशेषता म्हणजे या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नियमित खेळाडूंबरोबर निवृत्त झालेले दिग्गज तसेच देशांतर्गत क्रिकेटमधील युवा आणि वयस्कर खेळाडू देखील सहभागी होतात. यामुळे अनेक दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंना नवनव्या गोष्टी शिकायला मिळतात. यंदा देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळणार आहे. कोणताही सामना जिंकण्यासाठी युवा जोश सह अनुभवली खेळाडूंचे मार्गदर्शनही गरजेचे असते. यंदा युएई येथील आयपीएल दरम्यान युवा खेळाडूंसोबत वयस्कर खेळाडूंवरही सर्वांच्या नजरा असणार आहे. त्यांच्या खेळाऐवजी ते कदाचित पुढील वर्षी स्पर्धेत दिसणार नाही हे देखील यामागेचे कारण असू शकते. आयपीएलमध्ये वयाचे कोणतेही बंधन नसते त्यामुळे सर्व प्रकारचे खेळाडू या स्पर्धेत भाग घेतात. जोवर एखाद्याकडे प्रतिभा आहे आणि तो फिट असेल तोपर्यंत त्याला स्पर्धेत कोणत्याही संघात स्थान मिळेल. (Top 5 Best Catches in IPL History: उत्कृष्ट फिल्डिंग व झेल पकडून खेळाडूंनी बदलला सामना; आयपीएलच्या इतिहासातील 'हे' 5 हैराण करणारे कॅच पुन्हा पाहाच!)

आज आपण आयपीएल 2020 मधील सर्वात वयस्कर खेळाडूंचा आढावा घेणार आहोत. तर बघुयात, आयपीएलमधील सर्वात वयस्कर खेळाडूंच्या यादीत कोणकोणत्या खेळाडूचे नाव येते.

इमरान ताहिर- चेन्नई सुपर किंग्ज (41 वर्षे)

चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) सर्वात वृद्ध आणि अनुभवी खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज इमरान ताहिर. 40 वर्षीय ताहीर सीएसकेसाठी सातत्याने कामगिरी करत असल्याने ‘वय फक्त एक नंबर आहे’ हे सिद्ध करणारा एक आदर्श उदाहरण बनला आहे आणि तो आयपीएल 2019 मध्ये 17 सामन्यात 26 विकेटने हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

क्रिस गेल-किंग्ज इलेव्हन पंजाब (40 वर्षे)

वेस्ट इंडीजचा फलंदाज क्रिस गेल वाईन सारखाच आहे जो वयाबरोबर आणखी चांगला होतो. 40 शीत असलेला गेल गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास अजूनही सक्षम आहे. गेलने सर्वाधिक सहा शतके आणि सर्वाधिक 326 शतकात ठोकले आहेत. 2013 च्या आवृत्तीत गेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 66 चेंडूंत नाबाद 175 धावा केल्या होत्या. एकूणच गेलने 124 आयपीएल डावात 151.03 च्या स्ट्राईक रेटने 4484 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, गेल स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी आपला 41 वा वाढदिवस साजरा करणार आहे.

शेन वॉटसन-चेन्नई सुपर किंग्ज (39 वर्षे)

आयपीएल 2018 च्या लिलावादरम्यान सीएसकेने विकत घेतलेल्या वॉटसनने गेल्या दोन वर्षांत फ्रँचायझीसाठी 32 सामन्यांत 953 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या 2018 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियनने त्यांची सर्वोच्च धावसंख्या, नाबाद 117, फटकावली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही सुरू करण्यास सक्षम असलेला वॉटसन आयपीएल 2020 दरम्यान सीएसकेच्या योजनांचा एक महत्त्वाचा भाग असेल.

एमएस धोनी- चेन्नई सुपर किंग्ज (39 वर्षे)

धोनीने नुकताच आंतरराष्ट्रीय सेवानिवृत्तीची घोषणा केली आणि आता सीएसकेचा कर्णधार आयपीएलच्या माध्यमातून मैदानात उतरण्यासाठी उत्सुक असेल. धोनीने आपल्या लाडक्या सीएसके बरोबर तीन आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत आणि आता त्याच्या लक्ष्य चौथ्या विजेतेपदावर असेल. धोनीने सीएसकेसाठी कर्णधार म्हणून 174 सामने खेळले आहेत आणि विजयाची टक्केवारी 59.8 आहे. विकेटकीपर-फलंदाज 100 आयपीएल खेळ जिंकणारा पहिला कर्णधारही आहे.

दिल्ली कॅपिटल्स – अमित मिश्रा (37 वर्षे)

भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा हा पहिल्या हंगामापासून आयपीएलचा भाग आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आपल्या आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवात करणारा मिश्रा हा काही काळ डेक्कन चार्जर्स संघाचा भाग होता. तो आयपीएलच्या 13व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे. महत्त्वाचे म्हणजे, तो दिल्ली संघातील सर्वाधिक वयस्कर खेळाडू आहे. मिश्राने आतापर्यंत आयपीएलमध्ये 147 सामने खेळत 157 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

आयपीएलचा नवीन हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आहे. 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स स्पर्धेच्या पहिल्या सामन्यासाठी आमने-सामने येतील. सीएसकेला यंदाच्या हंगामात दोन अबूभावी खेळाडू-सुरेश रैना आणि हरभजन सिंह, यांची कमी नक्की जाणवेल. दोन्ही खेळाडूंनी वैयक्तिक कारणास्तव यंदा आयपीएलमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.