IPL 2020: आयपीएल 13 मध्ये एमएस धोनीची CSK फ्लॉप की झाली? जाणून घ्या 'ही' 4 कारणं
चेन्नई सुपर किंग्ज (Photo Credit: PTI)

Reasons Behind CSK Failure in IPL 2020: एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जवर (Chennai Super Kings) दोन वर्षांची बंदी घातली गेली होती ती दोन वर्ष वगळता प्रत्येक इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) प्ले-ऑफमध्ये खेळण्याचा अनोखा विक्रम नोंदवला आहे. तथापि, चेन्नई सुपर किंग्जचा हा अभिमानस्पद विक्रम यंदा तुटला आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात पहिल्यांदा महेंद्र सिंह धोनीचा सीएसके (CSK) संघ प्ले ऑफ गाठण्यात अपयशी ठरला आहे. यामुळे चाहतेच नाही तर तज्ञांना देखील धक्का बसला आहे. प्रत्येक वर्षी आयपीएलच्या पहिल्या 4 संघांमध्ये स्थान मिळवणारा चेन्नई सुपर किंग्स यंदा तळाशी बसलेला आहे. आयपीएलच्या 13व्या हंगामात सीएसके सर्वात वयस्कर संघ मनाला जातो. चेन्नईत युवा खेळाडूंपेक्षा जास्त 30 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या खेळाडूंचा भरणा आहे. (IPL 2021: आयपीएलच्या पुढील हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे नेतृत्व कोण करणार? पाहा काय म्हणाले, सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन)

राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव सीएसकेसाठी मोठा धक्का सिद्ध झाला. आरसीबीचा पराभव करूनही सीएसकेचे आव्हान संपुष्टात आले. आज आपण पाहणार आहोत युएईमध्ये सीएसकेच्या फ्लॉप होण्यामागची करणं जाणून घेणार आहोत.

1. सुरेश रैना-हरभजन सिंह यांची अनुपस्थिती

आयपीएल 2020 सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला. स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणारा सुरेश रैनाने वैयक्तिक कारणे सांगून स्पर्धेतून माघार घेतली आणि अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंहनेही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला. चेन्नईला त्यांची अनुपस्थिती भरपूर जाणवली. रैनाने मधल्या फळीत आणलेले समतोल साधण्यासाठी चेन्नईला संघर्ष करावा लागला. युएईमध्ये हरभजनचा अनुभव सीएसकेसाठी कामी आला असता जिथे पियुष चावला आणि रवींद्र जडेजा प्रभाव पडू शकले नाही. 

2. एमएस धोनीचा फॉर्म

गेल्या अनेक वर्षांत धोनी सीएसकेच्या फलंदाजीचा कणा राहिला आहे. भूतकाळात त्याने एकाधिक भूमिका साकारल्या - डेथ ओव्हरच्या वेळी योजनांची अंमलबजावणी करणारा, डाव स्थिर करत धावांचा पाठलाग करणारा अशा अनेक भूमिकेत आपण धोनीला आवर पहिले आहेत. पण आयपीएल 2020 धोनी यापैकी एकही भूमिकेत दिसला नाही. इतकंच नाही तर त्याच्या काही वेगवान खेळीदेखील चेन्नई सुपर किंग्जने सामन्यात परतण्याची शक्यता नसताना आल्या. त्याच्या कर्णधारपदीदेखील स्पार्कचा अभाव जाणवत होता.

3.  युवा खेळाडूंचा कमी वापर

या मुद्द्यावरून सीएसकेला अनेकदा चाहते आणि तज्ञांकडून फटकारले गेले आहेत. चेन्नई संघात कित्येक परदेशी खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून संघात कायम आहेत. हे सर्व पाहता, चेन्नई व्यवस्थापणाने यंदा युवा खेळाडूंचे समर्थन करण्याची गरज असताना त्यांना जास्त संधी दिल्या नाहीत. एन जगदीशन, आर साई किशोर आणि रुतूराज गायकवाड यांच्यासारख्या खेळाडूंना संधी देण्यास सीएसकेने टाळाटाळ केली. त्यातील काहींना संधी दिली गेली तरीही त्यांना जास्त अधिक सामने खेळता आले नाही.

4. विचित्र युक्ती

आयपीएलमध्ये काही पेटंट डावपेच पुढे आणण्यात सुपर किंग्ज अग्रणी राहिले आहेत. आयपीएल 2010 मध्ये मॅथ्यू हेडनला मैदानावर विचित्र ठेवणे लक्षात ठेवा! पण ते जुने किस्से झाले आहेत. सॅम कुरन बॅट आणि बॉल दोन्ही सहकार्याने करणारा उत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. चांगला फटका मारत फॉर्म देखवूनही कुरनला खालच्या स्थानावर फलंदाजी करावी लागली आणि 7 सामन्यांनंतर सलामीला बढती मिळाली. त्याचप्रमाणे आयपीएल 2019 चा पर्पल कॅप विजेता इमरान ताहिरला 7 सामन्यांनंतर संघात स्थान मिळाले. ड्वेन ब्रावोला दुखापतीमुळे अनुपस्थित असतानाही ताहीरचा समावेश केला गेला नाही.

पराभवानंतर तो आणि संघाला खूप दुःख झाले असल्याचेचेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने कबूल केले. 12 सामन्यात 8 गुणांसह सीएसके पॉईंट्स टेबलवर तळाशी बसलेले आहेत.