Fastest Ball in IPL History: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje) आयपीएलच्या (IPL) 2020 हंगामात आपल्या गोलंदाजीने सर्वांना चांगला प्रभावित करत आहे. यंदाच्या हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीने दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) प्रभावी कामगिरी केली असून सहा सामन्यांतून 10 विकेट मिळवल्या आहेत. मात्र, बुधवारी दुबईमध्ये राजस्थान रॉयल्सविरूद्ध (Rajasthan Royals) खेळताना नॉर्टजेने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला आणि विक्रम-पुस्तकात स्थान निश्चित केले. नॉर्टजेने आयपीएल इतिहासातील 156 किमी प्रति तास वेगाने चेंडूत टाकत विक्रमाची नोंद केली. याआधी, त्याचा दक्षिण आफ्रिकेचा सहकारी डेल स्टेनने 154.5 किलोमीटर प्रतितास वेगवान चेंडू टाकून विक्रमाची नोंद केली होती. नॉर्टजेच्या विक्रमी वेगवान चेंडूने रॉयलचा सलामीवीर जोस बटलरला (Jos Buttler) 22 धावांवर माघारी धाडले. रेकॉर्ड ब्रेकिंग चेंडूने नॉर्टजेने देखील चकित झालेला दिसला. (Jofra Archer Bihu Dance: पृथ्वी शॉला बाद केल्यानंतर जोफ्रा आर्चरने मैदानातच केला बिहू डान्स; पाहा संपूर्ण व्हिडिओ)
“खरचं? कल्पना नाही. हे प्रथमच ऐकत आहे, ”सामन्यानंतर त्याच्या विक्रमाबाबत विचारले असता नॉर्टजेने प्रत्युत्तर दिले. “[मला] गेल्या काही दिवसांपासून हे जाणवत आहे. काही निकाल पाहून आनंद झाला. बटलरने त्यांच्यासाठी खरोखर चांगले खेळले. कदाचित मी खूप फॉर्ममध्ये होतो. त्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याची अपेक्षा केली नव्हती. कदाचित त्याला चेंडूच्या वेळी दुसर्या कशाचीही अपेक्षा होती.” बटलरला बाद करण्यापूर्वी रॉयल्स सलामी फलंदाजाने नॉर्टजेचे सलग 2 चेंडू सीमारेषे बाहेर पाठवले होते. दरम्यान आयपीएलच्या 13व्या हंगामातील गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याच्या लढाईत दिल्ली कॅपिटल्सने 13 धावांनी राजस्थान रॉयल्सवर मात केली. पाहा नॉर्टजेचा विक्रमी चेंडू:
The five fastest balls in #IPL2020 so far have been bowled by Anrich Nortje:
156.22 kph
155.21 kph
154.74 kph
154.21 kph
153.72 kph
🔥🔥🔥#RRvsDC #Nortje pic.twitter.com/UmtS6FiuPV
— Ashish Sahani (@AshishCupid11) October 14, 2020
दुसरीकडे, नॉर्टजेने आयपीएल 2020 मध्ये आजवर सर्वाधिक 4 वेगवान चेंडू फेकले आहे. ही कामगिरी देखील त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध केली आहे. हंगामाच्या सुरूवातीस अष्टपैलू क्रिस वोक्सच्या जागी दिल्ली कॅपिटल्समध्ये स्थान मिळवलेल्या नॉर्टजेने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. नॉर्टजेने प्लेइंग इलेव्हनमधील आपले स्थान निश्चित केले असून दिल्लीच्या वेगवान हल्ल्यात दक्षिण आफ्रिकेचा सहकारी कगिसो रबाडा समवेत घातक भागीदारी केली आहे. नॉर्टजेने आतापर्यंत आयपीएल 13 मध्ये दिल्लीसाठी सर्व आठ खेळ खेळले आहेत आणि रबाडासह संघासाठी आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज आहे. रबाडाने 8 सामन्यात यंदा आयपीएलमध्ये 18 विकेट्स घेतल्या असून त्याने पर्पल कॅप बाजीच केली आहे.