Jofra Archer Bihu Dance: पृथ्वी शॉला बाद केल्यानंतर जोफ्रा आर्चरने मैदानातच केला बिहू डान्स; पाहा संपूर्ण व्हिडिओ
Jofra Archer (Photo Credits: Twitter/@RajasthanRoyals)

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल (Rajasthan Royals Vs Delhi Capitals) संघ यांच्यात आयपीएल 2020 चा 30वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रथम फलंदाजी करताना दिल्ली राजधानीची सुरुवात खूपच खराब झाली. दरम्यान, राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या (Jofra Archer) पहिल्याच चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) बाद झाला. त्यानंतर जोफ्रा आर्चरने रियान पराग याच्यासोबत मैदानातच बिहू डान्स केला. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहेत.

या सामन्यात जोफ्रा आर्चरने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. त्याने पृथ्वी शॉला बाद केल्यानंतर अजिंक्य रहाणे यालादेखील आपल्या जाळ्यात अडकवले. जोफ्रा आर्चरने त्याच्या पहिल्या 2 षटकात केवळ 5 धावा देऊन 2 विकेट्स मिळवले आहेत. मात्र, सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरने पृथ्वी शॉला बाद केल्यानंतर वेगळ्या अंदाजात आनंद व्यक्त केला आहे. हे देखील वाचा- Tushar Deshpande Quick Facts: राजस्थान रॉयल विरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा तुषार देशपांडे याच्याबद्दल घ्या जाणून

व्हिडिओ- 

याआधी राजस्थान रॉयल संघाचे युवा फलंदाज रियान परागने सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यात संघाला विजय मिळवून दिल्यानंतर बीहू डान्स केला होता. सनराइजर्स विरुद्ध सामन्यात त्याने राहुल तेवतियासोबत भागिदारी करत राजस्थानच्या संघाला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला होता. त्यावेळी त्याने केवळ 26 चेंडूत नाबाद 42 धावा ठोकल्या होता. मात्र, संघाला विजयासाठी 2 चेंडूत 2 धावांची गरज असताना रियान परागने षटकार ठोकून मैदानातच बीहू डान्स केला होता.