IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सच्या ‘त्या’ दोन विकेट्स घेत CSKच्या पियुष चावलाने 'या' यादीत मिळवले दुसरे स्थान, लसिथ मलिंगाला टाकले पिछाडीवर
CSKचा पियुष चावला (Photo Credit: PTI)

आयपीएल (IPL) 2020 च्या 7 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलविरुद्ध (Delhi Capitals) चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना सीएसकेचा (CSK) फिरकीपटू पियुष चावलाने (Piyush Chawla) या सामन्यात उत्कृष्ट यश संपादन केले. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलविरुद्ध तो सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. त्याने मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) लसिथ मलिंगाचा (Lasith Malinga) विक्रम मोडला आणि दुसऱ्या  स्थानावर पोहोचला. आयपीएलमध्ये डीसीविरुद्ध हरभजन सिंहने (Harbhajan Singh) सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये चावलाने आजवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 23 विकेट्स घेतल्या आहेत, तर मलिंगाच्या नावावर 22 विकेट आहेत. दुसरीकडे, हरभजनने या संघाविरूद्ध आजवर एकूण 24 विकेट घेतल्या असून तो या यादीत पहिल्या स्थानावर आहे. (CSK vs DC, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सचा CSKला डबल दणका, चेन्नईविरुद्ध 44 धावांनी मिळवला विजय; एमएस धोनीची पुन्हा संधी खेळी)

रविचंद्रन अश्विन दिल्लीविरुद्ध 20 विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. तथापि, अश्विन आता या मोसमात दिल्ली संघाचा भाग आहे. चावलाने आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवन, या खेळपट्टीवर स्थिर झालेल्या सलामी फलंदाजांच्या जोडीला बाद केले आणि चेन्नईला सामन्यात पुनरागम करुन दिले. चावलाने दिल्लीविरुद्ध 8.20 च्या इकॉनॉमी रेटने चार षटकांत 33 धावा देऊन दोन गडी बाद केले. दरम्यान, आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर, सीएसके टॉस जिंकून दिल्लीला पहिले फलंदाजी करण्यास सांगितले. अशा स्थितीत दिल्लीने विजयासाठी चेन्नईला 176 धावांचे आव्हान दिले, पण चेन्नईला 131 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि 44 सामन्यात पराभव पत्करावा लागला.

चेन्नईकडून फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक 35 चेंडूत सर्वाधिक 43 धावा केल्या, पण तो चेन्नईला विजय मिळवून देऊ शकला नाही. डु प्लेसिसव्यतिरिक्त केदार जाधवने 26 धावा केल्या. विशेष म्हणजे, या दोघांव्यतिरिक्त चेन्नईच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. धोनी 15, शेन वॉट्सन 14, मुरली विजय 10, रवींद्र जडेजा 12 धावा करुन बाद झाले. दिल्लीकडून सर्वाधिक कगिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. यापूर्वी, दिल्लीकडून पृथ्वी शॉने 43 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 64 धावांची खेळी केली.