चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

दुबईच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पहिले फलंदाजी करून चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) दिलेल्या 176 धावांच्या प्रत्युत्तरात दिल्लीने 44 धावांनी विजय मिळवला आणि सीएसकेचा (CSK) पराभवाचा दुसरा दणका दिला. सीएसकेचा आयपीएल (IPL) 13 मधील तीन सामन्यातील हा दुसरा पराभव ठरला. यापूर्वी राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले होते. सीएसकेकडून फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) सर्वाधिक 43 धावांचा डाव खेळला, पण तो टीमला विजय रेषा ओलांडू देऊ शकला नाही. केदार जाधवने 26, शेन वॉटसन 14 धावा करून माघारी परतले. दिल्लीच्या गोलंदाज सलग दुसऱ्या सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि चेन्नईच्या वेळोवेळी अडचणीत वाढ करत राहिले. कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) 3, एनरिच नॉर्टजे 2, अक्षर पटेलने 1 विकेट घेतली. सीएसकेकडून आज देखील कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) बॅटने प्रभाव पाडण्यात अपयश आले. धोनीने 15 धावा केल्या. (CSK vs DC आयपीएल सामन्यात एमएस धोनीने पुन्हा दाखवली चपळता, अफलातून कॅच घेत श्रेयस अय्यरला धाडलं माघारी Watch Video)

दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. 23च्या धावसंख्येवर चेन्नईला पहिला झटका बसला. वॉट्सन 14 धावा करत बाद झाला. तर, विजय 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर डु प्लेसिसला वगळता इतर फलंदाजांनी चांगली कामगिरी करता आली नाही. फाफशिवाय केदारने मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. तर, सहाव्या क्रमांकावर आलेल्या धोनीला यंदाही विशेष चांगली फलंदाजी करता आली नाही. धोनी अखेरच्या ओव्हरमध्ये 15 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजानेने 12 धावा केल्या. कुरन 1 धाव करून नाबाद राहिला.

यापूर्वी सामन्यात दिल्लीकडून युवा फलंदाज पृथ्वी शॉने जबरदस्त फलंदाजी केली. पृथ्वीने 43 चेंडूत 64 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी आणि शिखर धवन यांनी दणक्यात सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची खेळी केली, पण पियुष चावलाने धवनला बाद करून त्यांची भागीदारी मोडली. त्यानंतर पृथ्वीला देखील चावलाने माघार धाडले. दोन्ही सलामी फलंदाज बाद झाल्यावर दिल्लीचा डाव गडगडला. श्रेयस अय्यरही 26 धावा करत बाद झाला. धोनीनं जबरदस्त कॅच घेत अय्यरला बाद केले. रिषभ पंतने शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी केली. पंतने 6 चौकार मारत 37 धावा केल्या. चेन्नईकडून चावलाने 2 तर सॅम कुरनने एक विकेट घेतली. यानंतर मार्कस स्टोइनिस आणि पंतच्या जोडीने दिल्लीला 175 धावांपर्यंत मजल मारुन दिली.