IPL 2020 भारताबाहेर खेळवण्यासाठी BCCI सज्ज, बोर्ड अधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

भारतात 2 लाखाहून अधिक कोरोनाग्रस्त आणि लॉकडाउन (Lockdown) कायम असताना प्रसिद्ध टी-20 लीग इंडियन प्रीमिअर लीगचे (Indian Premier League) आयोजन कसे होईल याबाबत सर्वांना प्रश्न पडला आहे. मार्च अखेरीस सुरु होणारी स्पर्धा लॉकडाउनमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. आणि आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) टी-20 स्पर्धा भारताबाहेर हलविण्यावर विचार करत आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल (Arun Dhumal) म्हणाले की, हे खेळाडूंच्या सुरक्षेबाबत आहे. बीसीसीआय देशात कोरोनाच्या स्थितीतवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि स्थितीमध्ये सुधार न झाल्यास यंदा आयपीएल (IPL) परदेशात हलवण्याचा बोर्डाने विचार सुरु केला आहे. Timesnownew.com ला दिलेल्या मुलाखतीत धुमल यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. (IPL 2020: सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन करण्यास भारतीय बोर्ड उत्सुक, BCCI सूत्रांची माहिती)

“खेळाडूंच्या सुरक्षेला कोणताही धोका नसेल तर आम्ही आयपीएल भारतात आयोजित करण्याला प्राधान्य देऊ, पण परिस्थितीमुळे स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी न मिळाल्यास, आमच्याकडे अन्य पर्याय राहणार नाही. स्पर्धेसाठी विंडो उपलब्ध असल्यास स्पर्धा देशाबाहेर खेळवली जाऊ शकते.” 2008 मध्ये लोकसभा निवणूक आणि सुरक्षा दल उपलब्ध नसल्याने संपूर्ण आयपीएल दक्षिण आफ्रिकेत हलवावे लागले होते. 2014 मध्येही या कारणास्तव स्पर्धेचा काही भाग संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये खेळावा लागला होता.

“आम्ही दक्षिण आफ्रिकेत यापूर्वी स्पर्धा खेळवली होती. आम्ही हे स्वेच्छेने करू इच्छित नाही परंतु जर ही एकमेव शक्यता असेल तर याबद्दल कोणीही बरेच काही करू शकत नाही,” धुमल म्हणाले. यापूर्वी, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डला आयपीएल न झाल्यास 4,000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे समजले होते. शिवाय, क्रिकेटपटूंना बोर्डाकडून वेतन कपातीलाही सामोरे जावे लागू शकते. पूर्वी, जर अहवालांनुसार श्रीलंका आणि युएईने आयपीएलचे आयोजन करण्याची ऑफर दिली होती.