दिल्ली कॅपिटल्सचा अजिंक्य रहाणे (Photo Credit: Instagram)

IPL 2020 Mid-Season Transfer: दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंग यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier Leageu) 2020 मधील सर्वात प्रभावी संघांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. या स्पर्धेच्या अगोदरही कॅपिटल्सला यंदा स्पर्धा जिंकण्यासाठी पसंती दिली जात होती. दिल्ली कॅपिटल्समधील सर्व खेळाडू फॉर्ममध्ये आहेत आणि यामुळे आयपीएलचा (IPL) अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यंदा हंगामाचा पहिला सामना खेळण्याच्या संधीची वाट पाहत आहे. यंदा स्पर्धेत दिल्लीने आजवर 5 सामने खेळले आहेत, तर पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या सलामीच्या जोडीने प्रभावी सुरुवात करून दिली आहे. त्यामुळे, रहाणे मिड सीजन ट्रांसफरचा (Mid-Season Transfer) एक भाग असल्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. याबाबत DC अधिकाऱ्यांना विचारले असता ANIशी बोलताना ते म्हणाले की, शॉ आणि धवनचा फॉर्म इतका चांगला असल्याने व्यवस्थापनाकडे या दोघांकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. (RCB Vs DC, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू विरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा 59 धावांनी विजय)

“सोशल मीडियावर जे काही बोलले जाते ते संघ निवडीचे निकष असू शकत नाहीत. रहाणे एक हुशार खेळाडू आहे आणि त्याच्याकडे नारच अनुभव आहे. पण साधा मुद्दा असा आहे की धवन आणि शॉ टॉपवर चांगली कामगिरी करत आहेत. जे तुटले नाही ते आपण जोडू शकत नाही. तसेच, आपल्या लक्षात येईल की आम्ही गेल्या दोन हंगामांमध्ये ज्या खेळाडूंवर विश्वास ठेवला आहे त्यांच्याबरोबर आम्ही सुरू ठेवले पाहिले आहे. धवन आणि शॉ आमच्यासाठी सिद्ध परफॉर्मर्स आहेत. रहाणेला आपल्या डावासाठी प्रतीक्षा करावी लागेल," अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, दोन अर्धशतकांसह पृथ्वीने दिल्लीसाठी आजवर 5 सामन्यांत 179 धावा केल्या आहेत, तर धवनने तितक्याच सामन्यात 127 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सकडून मध्यम मोसमातील व्यापार करण्याच्या कल्पनेने रहाणेची अदला-बदल केली नाही, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान,  2010 चा हंगाम वगळता रहाणेने या स्पर्धेच्या प्रत्येक मोसमात सहभाग नोंदविला आहे. वर्षानुवर्षे तो राजस्थान रॉयल्सचा मुख्य खेळाडू होता. 2019 मध्ये त्याने रॉयल्ससाठी 14 सामने खेळले आणि 32.75 च्या सरासरीने 393 धावा केल्या. मागील हंगामात त्याने दिल्लीविरुद्ध नाबाद 105 धावा केल्या होत्या.