RCB vs SRH, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) शनिवारी आपल्या वेगवान कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आणि टी-20 क्रिकेटमध्ये 9000 धावा करणारा पहिला दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) क्रिकेटपटू आणि एकूण आठवा आठवा खेळाडू ठरला. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या डिव्हिलियर्सने इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या 51व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) हे लक्ष्य गाठले. मात्र शनिवारी डिव्हिलियर्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि तो केवळ 24 धावांवर बाद झाला. तथापि, 36-वर्षीय खेळाडू आतापर्यंतच्या सर्वात छोट्या स्वरूपात सर्वाधिक धावा असलेल्या खेळाडूंच्या यादीत आठव्या स्थानावर आहे. या एलिट यादीत क्रिस गेल, विराट कोहली, आरोन फिंच, शोएब मलिक, ब्रेंडन मॅक्युलम अशा टी-20मध्ये दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे ज्याने आजवर 13,572 टी-20 धावा केल्या आहेत. (RCB vs SRH, IPL 2020: हैदराबादच्या भेदक गोलंदाजीपुढे आरसीबी फलंदाजांची शरणागती, RCB चे सनरायझर्ससमोर विजयासाठी 121 धावांचे लक्ष्य)
डिव्हिलिअर्सनंतर भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा टी-20 क्रिकेट मध्ये आतापर्यंत 8902 धावा करून खेळत आहे. सर्वाधिक टी-20 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गेलने पहिले स्थान मिळवले आहे, तर त्याचा वेस्ट इंडिज सहकारी पोलार्डने दुसऱ्या सर्वाधिक 10425, शोएब मलिकने टी-20 मध्ये 10145 धावा केल्या आहेत. याशिवाय मॅक्क्युलमच्या नावाच्या टी-20 मध्ये 9922 धावांची नोंद आहे. वॉर्नरने आतापर्यंत 9712 धावा केल्या आहेत. याशिवाय टी-20 मध्ये कोहलीने 9331 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा मर्यादित ओव्हरचा कर्णधार फिंचने टी -20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 9275 धावा केल्या आहेत.
दुसरीकडे, हैदराबादविरुद्ध आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादविरुद्ध एबी 24 चेंडूंत 24 धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळीत 1 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. डिव्हिलियर्स व्यतिरिक्त कोहलीला देखील केवळ 7 धावा करता आल्या. डीव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 4734 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये एबीने आजवर 37 अर्धशतकं आणि 3 शतकंही झळकावली आहेत.