व्हिडिओग्राफर कॅमेरा | प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Pixabay)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 वरील संकट कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघातील दोन खेळाडू आणि 11 सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर टीव्ही टीममधील, स्टार प्रोडक्शन क्रू, (Star Production Crew) एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. प्रोडक्शनची पहिली बॅच आज युएइला (UAE) रवाना होणार होती. मात्र टीममधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचे उड्डाण थांबवण्यात आले आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या आयपीएलच्या 13 व्या आवृत्तीत चेन्नईच्या दोन खेळाडूंसह 13 जणांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे आणि सीएसकेच्या व्यवस्थापनाशी कथित काही मतभेदानंतर सुरेश रैना, चेन्नईस्थित फ्रँचायझीचा कायमस्वरुपी फलंदाज भारतात परतला आहे. (IPL 2020 Update: हॉटेल रूममुळे सुरेश रैना आयपीएल 13 मधून बाहेर पडला? सीएसके बॉस एन श्रीनिवासन काय म्हणाले एकदा वाचाच)

स्टार संघाच्या विविध विभागातील सर्वांत मोठा गट तयार होण्याची शक्यता असून रविवारी प्रथम बॅच बंगळुरु, दिल्ली, कोलकाता आणि मुंबई येथून रवाना होणार होता, एकाधिक सूत्राने IANSला माहिती दिली. पण, स्टार इंडियाने रविवारी या सर्वांना पुढील सल्ला देईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले. बीसीसीआयच्या सूत्रांनी IANSला सांगितले की, 'स्टारने आपल्या टीव्ही टीमच्या पहिल्या टीमला 31 ऑगस्टपर्यंत युएईला जाण्यास सांगितले होते. शनिवारी प्रत्येकाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती, त्यातील एक सदस्य पॉझिटिव्ह आढळून आला. ही बातमी मिळताच ब्रॉडकास्टर्सनी सर्वांना युएईला उड्डाण न करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी, प्रॉडक्शन टीमचे सदस्य युएईला पोचणार होते आणि लगेचच क्वारंटाइन होणार होते. परंतु, आता त्यांचे निघणे पुढे ढकलले गेले आहे, परंतु युएईला पोहोचल्यानंतर त्यांचा क्वारंटाइन कालावधी देखील जास्त असू शकतो.

सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे जगातील सर्वात आकर्षक क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यास अजून 18 दिवस शिल्लक असताना बीसीसीआयने अद्याप आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले नाही. चाहते, फ्रेंचायजी आणि खेळाडू उत्सुकतेने याची वाट पाहत आहेत. बीसीसीआय-आयपीएलच्या सूत्रांनी सांगितले की, स्टार आता इतर प्रोडक्शन टीममधील इतर सदस्यांच्या कोविड निकालासाठी प्रतीक्षा करेल आणि अबुधाबीमधील कठोर प्रोटोकॉलशिवाय युएईमध्ये आता आठ टीमच्या विकासावरही त्यांची नजर असेल. अबूधाबी येथे सीएसके आणि मुंबई इंडियन्सचा पहिला सामना खेळला जाणार आहे.