IPL 202, CSK vs SRH: अखेर हैदराबादचा सन‘राईज’, चेन्नईवर मात करत मिळवला पहिला विजय; जडेजाच्या ‘येलो आर्मी’चा सलग चौथा पराभव
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

IPL 202, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 17 व्या सामन्यात केन विल्यम्सनच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाने सीएसके (CSK) संघावर 17.4 षटकांत Glenn Maxwell, Jaydev Unadkat, ग्लेन मॅक्सवेल, जयदेव उनाडकट,8 विकेटने मात केली व अखेर आपल्या विजयाचे खाते उघडले. हैदराबाद संघाचा तीन सामन्यांपैकी पहिला विजया ठरला आहे तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या सुपर किंग्स संघाला सलग चौथा पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नईने पहिले फलंदाजी करून हैदराबादसमोर विजयासाठी 155 धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते, जे विल्यमसनच्या नेतृत्वातील संघाने एक विकेट गमावून विजय मिळवला. हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने सर्वाधिक 75 धावा केल्या. तर राहुल त्रिपाठी याने नाबाद आणि कर्णधार विल्यमसनने 32 धावा केल्या. दुसरीकडे, चेन्नईला खराब फलंदाजीनंतर निराशाजनक गोलंदाजीचा जोरदार फटका बसला आहे. चौथ्या पराभवासह चेन्नईचा संघ गुणतालिकेत आणखी खाली घसरला आहे.

सामन्याबद्दल बोलायचे तर अभिषेक आणि विल्यमसनच्या सलामी जोडीने चेन्नईने दिलेल्या 155 रन्सच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात सावध सुरुवात केली. अभिषेक फटकेबाजी करत असताना विल्यम्सन संथ खेळला. दोंघांनी पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करून संघाला शानदार सुरुवात करून दिली. यादरम्यान दोघांनी चेन्नईच्या गोलंदाजांना पहिल्या विकेटसाठी जोरदार संघर्ष करण्यास भाग पाडले. मुकेश चौधरी याने हैदराबादचा कर्णधार विलियम्सनच्या रूपात पहिली विकेट मिळवून दिली. विल्यमसन 40 चेंडूत 32 धावा करून तंबूत परतला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार लगावला. विल्यमसन बाद झाल्यावर आलेल्या त्रिपाठीने अभिषेक सोबत फटकेबाजी करून संघाच्या विजयावर चेन्नईच्या चौथ्या पराभवावर शिक्कामोर्तब केला. त्रिपाठीने आपल्या 50 चेंडूत 75 धावांच्या खेळत 5 चौकार आणि 3 षटकार मारला.

यापूर्वी टॉस गमवून हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 154 धावा केल्या. चेन्नईच्या संघाची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये संघाने रॉबिन उथप्पा आणि रुतुराज गायकवाड हे दोन गडी गमावले. चेन्नईकडून अष्टपैलू मोईन अली याने सर्वाधिक 48 धावा केल्या. एमएस धोनी देखील फारसे योगदान देऊ शकला नाही 3 धावा करून बाद झाला आणि कर्णधार रवींद्र जडेजाने 23 धावा केल्या. दुसरीकडे, हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांनी 2-2 विकेट घेतल्या.