IPL 2019 चे विजेतेपद पटकवल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाची सेलिब्रेशन सफर; पहा फोटोज, व्हिडिओज
IPL 2019 Champions Mumbai Indians (Photo Credits: IANS)

IPL 2019 Mumbai Indians Celebration: आयपीएल 2019 चे विजेतेपद पटकवल्यानंतर आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची सेलिब्रेशन सफर रंगणार आहे. पुणेरी साज आणि ढोल ताशांच्या गजरात मुंबई इंडियन्स संघाच्या मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. मुंबईतील पेडर रोडवरील (Pedder Road) अंबानी हाऊस (Ambani House) येथून ते मरिन ड्राइव्ह (Marine Drive) वरील ट्रेडेन्ट हॉटेल (Trident Hotel) पर्यंत ओपन बस मधून मुंबई संघ चाहत्यांना भेटणार आहे. आयपीएल 12 च्या विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांचे हटके डान्स सेलिब्रेशन (Watch Video)

Mumbai Indians ट्विट:

विजयाच्या या जंगी सेलिब्रेशनसाठी मुंबई संघासह अनेक चाहते देखील उत्सुक आहेत. मुंबई इंडियन्स या संघाने चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकवण्याचा विक्रम केला आहे.