IPL 2019: चेन्नई सुपर किंग्सच्या विजयानंतर शाहरुख खान, महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी धोनी यांचा 'हा' फोटो सोशल मीडियात व्हायरल (Photo)
Shahrukh Khan & M.S. Dhoni (Photo Credits: File Photo)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या 12 वा सीजनमधील चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स (KKR) यांच्यात काल चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर (M. A. Chidambaram Stadium) सामना रंगला. या सामन्यात चेन्नई संघाने कोलकतावर 7 विकेट्सने विजय मिळवत सीजनमधील पाचवा सामना जिंकला. या सामन्यानंतर कर्णधार महेंद्र सिंग धोनी याचा एक खास फोटो समोर येत आहे. CSK Vs KKR, IPL 2019: हरभजन सिंग याची बुलेट कॅच आणि इमरान ताहिर याच्या शिट्टीची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)

सामना जिंकून ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना धोनीची नजर स्टेडिअममध्ये वर उभ्या असलेल्या कोलकाता नाइट राइडर्सचे मालिक आणि बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्यावर पडली. तेव्हा शाहरुख खानच्या बाजूला धोनीची पत्नी साक्षी देखील उपस्थित होती.

या फोटोत शाहरुख खाली उभ्या असलेल्या धोनीकडे पहात आहे आणि धोनी देखील शाहरुखच्या नजरेला नजर देत आहे. हा सर्व प्रसंग साक्षी धोनी बाजूला उभी राहून पाहात आहे. या फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून शाहरुख आणि धोनी यांनी एकमेंकांकडे बघून दिलेली स्माईल चर्चेचा विषय ठरत आहे.

पहा फोटो:

काल झालेल्या सामन्यात कर्णधार धोनीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या कोलकताच्या आंद्रे रसेलने नाबाद अर्धशतकी खेळी केली. मात्र बाकी कोणाची साथ न लाभल्याने 9 विकेट्स गमावत कोलकता संघाने 109 धावांचे लक्ष्य चेन्नईपुढे ठेवले. त्यानंतर चेन्नईचा सलामीवीर फाफ डुप्लेसिसने नाबाद 43 धावा केल्या. त्यानंतर टीमने 17.2 ओव्हरमध्ये केवळ 3 विकेट्स गमावत लक्ष्य साध्य केले.