CSK Vs KKR, IPL 2019: हरभजन सिंग याची बुलेट कॅच आणि इमरान ताहिर याच्या शिट्टीची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)
CSK Vs KKR, IPL 2019: (Archived, edited, representative images) | (Photo Credits: File Photo)

इंडियन प्रीमियर लीग च्या 12 सीजनमधील चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स (KKR) हा सामना काल चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर रंगला. या सामन्यात जबरदस्त गोलंदाजीच्या आधारावर कोलकाता नाइट राइडर्सवर चेन्नई सुपर किंग्सने 7 विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या कोलकत्ताने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावत 108 धावा केल्या आणि चेन्नई संघापुढे 109 धावांचे लक्ष्य ठेवले. चेन्नईचा सलामीवीर फाफ डुप्लेसिसने 43 धावा केल्या. तर अंबाती रायुडू, सुरेश रैना आणि शेन वॉटसन यांनी अनुक्रमे 21, 14 आणि 17 धावांचे योगदान दिले. चेन्नईसमोर असलेले 109 धावांचे लक्ष्य टीमने 17.2 ओव्हरमध्ये केवळ 3 विकेट्स गमावत साध्य केले.

कोलकता संघाने पहिल्या 10 ओव्हरमध्येच 6 विकेट्स गमावल्या. चेन्नईच्या दीपक चहारने तीन विकेट्स घेतल्या तर इमरान ताहिरने कोलकता संघाला 2 विकेट्सचा झटका दिला. मात्र सामन्यात हरभजन सिंगने दिनेश कार्तिकच्या घेतलेल्या बुलेट कॅचची खूप चर्चा रंगली. इमरान ताहिर गोलंदाजी करत असताना हरभजनने घेतलेल्या कॅचनंतर खूश झालेल्या ताहिरने शिट्टी मारत आनंद व्यक्त केला. बुलेट कॅच, शिट्टीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तुम्हीही पहा हा व्हिडिओ...

आतापर्यंत झालेल्या 6 पैकी केवळ एका सामन्यात चेन्नईला मुंबई इंडियन्सविरुद्ध हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे 10 पाईंट्ससह चेन्नईचा संघ अव्वल स्थानी आहे.