IPL 2019 मध्ये किती सामने खेळायचे याचा निर्णय पूर्णपणे खेळाडू घेतील- विराट कोहली
Virat Kohli (Photo Credits: Getty)

वर्ल्ड कपची (World Cup 2019) धूम सुरु होण्यापूर्वी इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) उत्साह सर्वच खेळाडूंमध्ये आहे. IPL 2019 मध्ये खेळण्याबद्दल विराट कोहलीने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोणत्या खेळाडूला किती सामने खेळायचे आहेत, याचा निर्णय पूर्णपणे खेळाडूंवर सोपवण्यात आला आहे. आयपीएल ची धूम 23 मार्चपासून सुरु होईल. तर आयपीएल संपल्यानंतर लगेचच टीम इंडिया वर्ल्डकपसाठी इंग्लंडला रवाना होणार असून 30 मे पासून वर्ल्ड कपचा जल्लोष सुरु होईल. Game Banayega Name संकल्पनेवर IPL 12 चं खास थीम सॉंग, महेद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा खास अंदाज (Video)

खेळाडूंवर अतिरिक्त भार पडू नये म्हणून निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी फ्रेंचाईजीशी चर्चा केली आहे. मात्र या सगळ्यावर विराट कोहली म्हणतो की, "आयपीएल काळात येणारा ताण चतुराईने हाताळावा लागेल. वर्ल्डकपसाठी फिट राहण्याची जबाबदारी सर्वस्वी खेळाडूंची आहे. तसंच वर्ल्ड कपसाठी सर्व फिटनेससहीत सर्व गोष्टींवर लक्ष ठेवले जाईल."

पुढे विराट कोहली म्हणाला की, "आम्हाला अशी वेळ सांगा ज्यावेळी आम्ही आराम करु शकू आणि आम्ही त्याचा नक्कीच फायदा घेऊ. वर्ल्ड कप चार वर्षातून एकदा येतो. आयपीएल दरवर्षी होते. याचा अर्थ असा नाही की आयपीएल आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. फक्त हुशारीने निर्णय घ्यावे लागतील आणि याची संपूर्ण जबाबदारी खेळाडूची असेल. कोणालाही कोणताही निर्णय घेण्यासाठी भरीस पाडले जाणार नाही." IPL 2019 चा उद्घाटन सोहळा रद्द; पुलवामा हल्ल्यातील शहीद कुटुंबांना दान करणार रक्कम- BCCI

पुढे कोहली म्हणाला की, "हे सत्र भारतीय टीमसाठी अत्यंत व्यस्त होते. मात्र टीममध्ये चांगला आत्मविश्वास आहे आणि आयपीएलची मज्जा घेण्याचा हक्क टीमला आहे. मात्र सातत्याने खेळण्याचा परिणाम नक्की खेळावर होतो. ही कोणतीही सबब नाही. मात्र जेव्हा तुम्ही टीम म्हणून खेळता तेव्हा तुमच्याकडून जिंकण्याची अपेक्षा केली जाते."