IPL 2019 Theme Song:  Game Banayega Name संकल्पनेवर IPL 12 चं खास थीम सॉंग, महेद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा खास अंदाज (Video)
IPL 2019 Theme Song (Photo Credits: Twitter)

Game Banayega Name IPL 12 Theme Song: IPL 12 चे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच ही धूम सुरू होणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहते आयपीएलसाठी उत्सुक असतात. आयपीएल 12 सुरू होण्यापूर्वी यंदा त्याचं खास थीम सॉंग लॉन्च करण्यात आलं आहे. क्रिकेट चाह्त्यांसोबतच भारतीय क्रिकेटर्सकडूनही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सामान्य मुलं आणि क्रिकेट जगतातील दिग्गज अशांमध्ये रंगलेला सामना 90 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे. मात्र Game Banayega Name या संकल्पनेवर आधारित असलेल्या या व्हिडिओमध्ये एक खास संदेश देण्यात आला आहे.

GameBanayegaName Song: 

महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली या GameBanayegaName थीम सॉगमध्ये झलकले आहेत. समान्य मुलांचा खेळच त्यांचं नाव बनवेल या आशयाचा मेसेज या तिघांनी व्हिडिओच्या शेवटी दिला आहे. IPL 2019 चा उद्घाटन सोहळा रद्द; पुलवामा हल्ल्यातील शहीद कुटुंबांना दान करणार रक्कम- BCCI

यंदा 23 मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. सध्या 17 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून पहिला सामना चैन्नई सुपरकिंग़ विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरू यांच्यामध्ये रंगणार आहे.