Chennai Super Kings | MS Dhoni (Photo Credits: Twitter @IPL)

IPL 2019 Schedule For  1st two Weeks: यंदा इंडियन प्रिमियर लीगचा (Indian Premier League)  12 वा सीझन रंगणार आहे. या सीझनचं पहिल्या दोन आठवड्याचं वेळापत्रक नुकतचं जाहीर कारण्यात आलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये आयपीएलच्या वेळापत्रकामध्ये आणि सामने नेमके कुठे खेळले जातील यावर प्रश्नचिन्ह होते. IPL 12 व्या सीझनच्या पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर केल्याप्रमाणे पहिला सामना महेंद्र सिंग धोनीच्या (M S Dhoni) चैन्नई सुपरकिंग (Chennai Super Kings) विरूद्ध विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरू ( Royal Challengers Bangalore ) मध्ये पहिला सामना रंगेल. 23 मार्चपासून आयपीएल 2019 च्या सामन्यांना सुरूवात होईल. IPL Auction 2019: आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी कोणत्या खेळाडूला किती मिळाला भाव?

कसे असतील आयपीएल 2019 चे सामने?

आयपीएल 2019 च्या सामन्यांमध्ये जाहीर केलेल्या पहिल्या दोन आठवड्यांच्या सामन्यांमध्ये एकूण 17 सामने रंगतील. प्रत्येक संघाला त्यांच्या होम ग्राऊंडवर 8 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.

आगामी लोकसभेच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे निवडणुकींच्या तारखा पाहता भविष्यात आयपीएलच्या सामन्यांच्या तारखेमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. त्याबाबत बीसीसीआय माहिती देईल.