WTC Final: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने यजमानांचा 2-0 ने पराभव केला. या मालिकेतील विजयामुळे भारताचा जागतिक कसोटी अंजिक्यपदच्या अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. भारताच्या विजयाने दक्षिण आफ्रिकेच्या (SA) अडचणी वाढल्या आहेत. या मालिकेनंतर जागतिक कसोटी अंजिक्यपदच्या (WTC) पॉइंट टेबलवर एक नजर टाकल्यास भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या, दक्षिण आफ्रिका तिसऱ्या आणि श्रीलंका चौथ्या स्थानावर आहे. एकूण चार संघ (भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका) जागतिक कसोटी अंजिक्यपदच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या शर्यतीत आहेत. अशा स्थितीत भारताच्या या विजयाने दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या फायनलमध्ये जाण्याचे स्वप्न धुळीला मिळाले आहे.
फायनलचा मार्ग मजबूत
या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले आहे. भारत आधीच दुसऱ्या क्रमांकावर होता आणि आता तिसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेवरून त्याने आघाडी घेतली आहे. भारताची विजयाची टक्केवारी आता 58.93 आहे. आणि दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 54.55 आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN: आऊट झाल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंवर भडकला विराट कोहली, पहा व्हिडिओ)
भारताची स्थिती आता मजबूत
मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय भूमीवर होणाऱ्या सध्याच्या चॅम्पियनशिपमध्ये भारताला अजून 4 सामने खेळायचे आहेत. दुसरीकडे, तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला दोन सामने खेळायचे आहेत. श्रीलंका 53.33 विजयी टक्केवारी गुणांसह चौथ्या स्थानावर आहे आणि त्याला न्यूझीलंडविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. सर्व समीकरणे लक्षात घेऊन भारताची स्थिती आता मजबूत झाली आहे.