Fastest Centuries in T20I: भारताची टी-20 मध्ये 3 वेगवान शतके, रोहित-सूर्याचाही यादीत समावेश; आता अभिषेक शर्माने मारली ऍन्ट्री
Abhisekh Sharma (Photo Credit - X)

Fastest Centuries in T20I: अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. दुर्दैवाने पहिल्या सामन्यात अभिषेक शून्य धावांवर बाद झाला होता, मात्र कारकिर्दीतील दुसऱ्या सामन्यात त्याने शतक झळकावले आहे. आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून खेळणाऱ्या अभिषेक शर्माने फक्त 46 चेंडूत शतक पूर्ण करून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये अभिषेक शर्मापेक्षा दोन खेळाडू आहेत. (हे देखील वाचा: India Beat Zimbabwe: झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर खूप आनंदी दिसला कर्णधार गिल, 'या' दोन खेळाडूंचे मन मोकळे पणे केले कौतुक)

सर्वात वेगवान शतकांची यादी

रोहित शर्मा (35 चेंडू) - आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय खेळाडू म्हणजे रोहित शर्मा. 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या 35 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. त्या सामन्यात रोहितने केएल राहुलसोबत 165 धावांची सलामीची भागीदारीही केली होती. रोहित शर्माने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 10 षटकार मारले. टीम इंडियाने हा सामना 88 धावांनी जिंकला होता. जगातील सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत रोहित चौथ्या क्रमांकावर आहे.

सूर्यकुमार यादव (45 चेंडू) - भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव. 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने 45 चेंडूत शतक पूर्ण केले होते. या चकमकीत सूर्यकुमार 51 चेंडूत 112 धावा करून नाबाद परतला आणि या डावात त्याने 7 चौकार आणि 9 षटकार लगावले. यावेळी भारताने श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव केला होता.

अभिषेक शर्मा/केएल राहुल (46 चेंडू) - टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अभिषेक शर्मा आणि केएल राहुल संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राहुलने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 46 चेंडूत शतक झळकावले होते. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 5 षटकार मारले. तर 2024 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध अभिषेक शर्माने 46 चेंडू खेळून आपले शतक पूर्ण केले होते. त्याच्या खेळीत 7 चौकार आणि 8 षटकार होते. भारताने हा सामना 100 धावांनी जिंकला.