IND vs SL 2nd T20 Live Streaming Online: तीन वर्षांनंतर भारतीय संघ पुण्यात खेळणार टी-20 सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह
IND vs SL (Photo Credit - Twitter)

IND vs SL 2nd T20: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील (IND vs SL 2nd T20) दुसरा सामना गुरुवारी होणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला पहिला सामना भारताने दोन धावांनी जिंकला. सध्या ते मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकला तर मालिकाही खिशात घालतील. या दरम्यान, भारतीय संघ तीन वर्षांनंतर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळणार आहे. टीम इंडिया पहिल्यांदा 2012 मध्ये इंग्लंडसोबत खेळली होती. त्यानंतर त्यांनी पाच विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर 2016 मध्ये भारताचा श्रीलंकेविरुद्ध पाच विकेट्सनी पराभव झाला होता. त्याचवेळी, जानेवारी 2020 मध्ये टीम इंडियाने लंकन संघाचा 78 धावांनी पराभव करून बरोबरी साधली होती. (हे देखील वाचा: Asia Cup 2023 मध्ये India आणि Pakistan एकाच गटात, अध्यक्ष Jay Shah यांनी दिली मोठी माहिती)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना 5 जानेवारीला म्हणजे आज होणार आहे आणि हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन येथे खेळवला जाणार आहे.

दुसरा टी-20 सामना किती वाजत खेळवला जाणार आहे?

भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे तसेच 6.30 वाजता नाणेफेक होईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही कोणत्या चॅनलवर पाहू शकता?

तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. तुम्ही स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु, स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड वर भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना पाहू शकतात

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पाहू शकतात?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही विनामूल्य कुठे पाहू शकता?

डीडी फ्री डिश प्लॅटफॉर्मद्वारे डीडी स्पोर्ट्सवर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील T20 मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही विनामूल्य पाहू शकता.