IND vs NZ 1st ODI: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील (ODI Series) पहिला सामना उद्या ऑकलंड येथे होणार आहे. भारतीय संघाने यापूर्वीच टी-20 मालिका जिंकली आहे. आता शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघाला वनडे मालिकाही आपल्या नावावर करायची आहे. टीम इंडियाच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवातही याच मालिकेतून होणार आहे. पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक फक्त भारतात खेळवला जाणार आहे. त्याला खेळाडूंना आजमावण्याची संधी अजूनही आहे. पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतून वरिष्ठ खेळाडूही संघात परतणार आहेत. या दौऱ्यातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवार, 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना ऑकलंडच्या ईडन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना किती वाजता सुरु होणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार 7 वाजता सुरू होईल. नाणेफेक सकाळी 6.30 वाजता होईल.
सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?
न्यूझीलंड दौऱ्यावर भारताचे एकदिवसीय सामने प्रसारित करण्याचे अधिकार डीडी स्पोर्ट्सकडे आहेत. हे फक्त डीडी फ्री डिशवर आहे. डीडी फ्री डिशवर डीडी स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही सामन्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकता. (हे देखील वाचा: IND vs NZ Head to Head: एकदिवसीय सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचा कसा आहे हेड-टू-हेड रेकॉर्ड, जाणून घ्या कोण आहे वरचढ)
फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी बघणार?
अमेझॉन प्राइम व्हिडिओ अॅपवर भारतात पहिल्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.