भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने 2015 नंतरच्या विश्वचषकानंतरच्या दुखापतीतून बाहेर येत असताना त्याने तीन वेळेस आत्महत्या करण्याचा विचार केला होता. शमीने इंन्टाग्रामवर रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत बोलताना या प्रकाराचा खळबळजनक खुलासा केला आहे. शमी याने असे म्हटले आहे की, काही खासगी जीवनात एकाग्रता कायम ठेवण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला होता. तसेच 2015 मध्ये मला दुखापत झाली होती. त्यानंतर जवळजवळ 18 महिने टीम मध्ये पुन्हा वापसी करण्यासाठी लागला होता. मात्र त्या दरम्यानचा काळ माझ्यासाठी सर्वाधिक मुश्किल असल्याचे शमी याने म्हटले आहे.
शमी याने या घटनेचा सविस्तर खुलासा करत असे म्हटले आहे की, रिहॅब किती मुश्किल असते आणि त्यानंतर घरातील समस्या असे सगळे सुरु होते. याच दरम्यान आयपीएलच्या 10-12 दिवस आधी माझा अपघात झाला होता. मीडियात सुद्धा खुप काही बोलले जात होते माझ्या खासगी आयुष्याबबात. शमीने त्याची टीममधील वापसी ही घरातल्यांच्या समर्थानामुळे मिळाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जर मला घरातील मंडळींकडून पाठिंबा मिळाला नसता तर मी क्रिकेट सोडून दिले असते. मी तीन वेळेस आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा केला होता. परिवारातील एखादा तरी व्यक्ती माझ्यावर नजर ठेवण्यासाठी माझ्या बाजूला बसलेले असायचे. माझे घर 24 व्या मजल्यावर असून त्यांना असे वाटायचे की मी इमारतीवरुन उडी घेत आयुष्य संपवणार आहे.(ICC रँकिंगमध्ये झाला मोठा बदल, 'या' कारणामुळे भारतीय टीमने टेस्ट क्रमवारीत गमावले अव्वल स्थान)