MS Dhoni Announces Retirement from International Cricket: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
MS Dhoni (Photo Credits: Getty Images)

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. तसेच दिग्गज खेळाडूंनी धोनीच्या निवृत्तीबाबत आपले मत मांडले होते. अखेर आज 15 ऑगस्ट रोजी महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने घेतलेल्या या निर्णायाचा अनेकांना मोठा धक्का लागला आहे. याआधीही त्याने कसोटी सामन्यातून अचानक निवृत्ती जाहीर केली होती. भारतीय क्रिकेट संघातील यशस्वी कर्णधारांपैकी धोनी एक होता. धोनीने आपल्या सर्वोकृष्ट कामगिरीच्या जोरावर क्रिकेट विश्वात आपली अनोखी ओळख निर्माण केली होती

महेंद्रसिंह धोनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी 7.29 पासून मला निवृत्त समजले जावे", असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्या पोस्टसोबतच धोनीने एक व्हिडीओही शेअर केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल सामन्यांमध्ये मात्र दिसणार आहे. 39 वर्षीय धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. हे देखील वाचा- Suresh Raina Retires: भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

एएनआयचे ट्वीट-

महेंद्र सिंह धोनीने 23 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. धोनीने आतापर्यंत एकूण 538 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने 17 हजार 266 धावा केल्या आहेत. ज्यात 16 शतक आणि 108 अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच 359 षटकार लावले आहेत. याशिवाय, धोनीने स्टम्पच्या पाठीमागे राहून 634 कॅच घेतले असून तब्बल 195 स्टम्पिंगचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.