सुरेश रैना (Photo Credit: Getty)

भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याआधी काही क्षणापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्र धोनी यानेही आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सुरेश रैना हा गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर होता. सुरेश रैनाने नुकताच चैन्नई सुपर किंग्ज संघाच्या खेळाडूंसह एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत धोनीदेखील आहे. तसेच धोनी तुझ्यासोबत खेळण्याचा मला आनंद आहे. पूर्ण अभिमानाने मी तुझ्या प्रवासात सहभागी होऊ इच्छितो. तसेच भारताचे आभार मानत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

 

सुरेश रैनाच्या गेल्या वर्षी गुढघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रैना प्रयत्न करत होता. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर टी-20 वर्ल्डकपमधील भारतीय संघाची निवड होणार होती. त्यामुळे धोनी प्रमाणे रैनाचा देखील चांगली कामगिरी करून भारतीय संघात प्रवेश करण्याचा प्रयत्न होता. गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर इरफान पठाणशी बोलताना रैनाने निवड समितीने चांगली कामगिरी करून देखील दखल घेतली नाही अशी खंत व्यक केली होती. हे देखील वाचा- MS Dhoni Retirement from International Cricket: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

एएनआयचे ट्वीट-

सुरेश रैनाने 226 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 5 हजार 615 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके, 36 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, रैनाने 78 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 1 हजार 604 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच सुरेश रैनाने 193 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 5 हजार 368 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक, 38 अर्धशतक केले आहेत.