Vadodara Floods: बडोदा पूरग्रस्तांसाठी इरफान आणि युसूफ पठाण बनले मसीहा, अशा प्रकारे करताहेत मदत
युसूफ पठाण (Photo Credit: @Aapnu_vadodara/Twitter)

संपूर्ण भारतात सध्या पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. महाराष्ट (Maharashtra), गुजरात (Gujarat), बिहार, उत्तर प्रदेश सारख्या शहरांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. यंदाचा हा पाऊस बडोदा (Vadodara) शहरातील रहिवाशांना नेहमीच आठवणीत राहिल. बडोद्यामध्ये मागील दोन-तीन दिवसांपासून पाऊस जोरदार बॅटिंग करत आहे. त्यामुळे तिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी देखील  संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) त्या पीडितांसाठी मसीहा म्हणून पुढे आले आहेत.

भारतीय क्रिकेटचे हे पठाण बंधू आणि त्यांची टीम वडोदरामधील पूरग्रस्तांना अन्न व मूलभूत वस्तू प्रदान करत आहेत. सोशल मीडियावर या दोन भावांचे कौतुक होत आहे. त्यासह त्यांचे काही फोटोज देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका पाहतो युसूफ लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करताना दिसतोय. शिवाय तो काही लोकांना जेवण देताना देखील दिसतोय. त्यांच्या एका महिला फॅन ने ट्वीटला करून त्यांच्याकडून मदत मागितली. या महिलेने युसूफ आणि इरफान यांना ट्विट करत लिहिले की पावसामुळे काही मुली छात्रावासात फसून गेल्या आहेत आणि मागील काही दिवसांपासून त्यांच्याकडे जेवण देखील नाही आहे. या ट्वीटचे उत्तर म्हणून इरफानने त्वरित रिप्लाय दिला आणि लिहिले की त्यांच्यापर्णात त्वरित मदत पोहचेल.

दरम्यान, बडोदामधील पावसामुळे काही भागांत वीज नाही. तसंच जनजीवन विस्कळीत झालं आहे. या दरम्यान सोशल मीडियावर एका माणसाचा फोटो चर्चेचा विषय बनला होता. या फोटोत एका माणसाने टोपल्यात एका मुलाला डोक्यावर उचलून घेतलं आणि भर पावसात बाहेर निघून आला. हा माणूस म्हणजे बडोद्याचे पीएसआय गोविंद चावडा आहेत. ज्यांनी 45 दिवसांच्या मुलाला गळाभर पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढले.