Australia Tour of India 2020 (Photo Credit: Twitter)

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे पोहोचला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 4 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना 27 नोव्हेंबरला खेळला जाईल. दौर्‍याचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी संघ सध्या 14 दिवस क्वारंटाइनमध्ये आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात भारतीय संघ नेटमध्ये कसून सराव करताना दिसत आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ चांगली कामगिर करुन दाखवेल, अशी अपेक्षा आहे.

आयपीएलमधील उल्लेखनीय कामगिरीनंतर आता टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये चमकण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या भारतीय संघ क्वारंटाईनमध्ये असून खेळाडूंना सरावासाठी परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान, विराट कोहलीने नेटमध्ये सराव करत व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात रविंद्र जाडेजा गोलंदाजीवर स्वत: विराट कोहली फलंदाजी करताना दिसत आहे. हे देखील वाचा- MPL Kit Sponsor of Team India: टीम इंडियाच्या जर्सीवर दिसेल एमपीएल चा लोगो; किट स्पॉन्सरशिप साठी BCCI सोबत गेमिंग अॅपचा 3 वर्षांचा करार

विराट कोहली याचे ट्वीट-

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा बॉर्डर- गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यांच्या तिकिटांची मागणी केली आहे. हा मालिकेतील एकमेव सामना आहे, ज्यात विराट कोहली खेळणार आहे. या सामन्यानंतर विराट आपल्या मायदेशात परत येणार आहे.