Shardul Thakur And Mitali Parulkar (Photo Credit - Twitter)

Shardul Thakur Wedding: भारतातील सर्वात प्रतिभावान क्रिकेटपटूंपैकी एक शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रिपोर्ट्सनुसार, शार्दुल 27 फेब्रुवारीला (Shardul Thakur Marriage Date) मिताली परुलकरसोबत (Mitali Parulkar) लग्न करणार आहे. 25 फेब्रुवारीपासून या जोडप्याचा विवाहसोहळा सुरू होणार आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये शार्दुलने मितालीसोबत साखरपुडा केला होता मात्र या सगळ्यात आता हे दोन्ही जोडपे लग्नाच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. शार्दुल ठाकुर सध्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेश दोऱ्यावर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shardul Thakur (@shardul_thakur)

शार्दुलची भावी पत्नी मिताली ही व्यवसायाने एक बिझनेसवुमन आहे. मितालीने तिच्या लग्नाबद्दल पुढे सांगितले की, या सोहळ्याला फक्त 200 ते 250 पाहुणे येणार आहेत. टीम इंडियासाठी शार्दुलचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन मी लग्नाची सर्व तयारी करत असून लग्नाच्या दिवशीच शार्दुल ठाकूर या लग्नाला उपस्थित राहणार आहे. (हे देखील वाचा: बांगलादेश दौऱ्यानंतर KL Rahul घेणार पुन्हा विश्रांती, कारण जाणून तुम्ही व्हाल अवाक)

मिताली पुढे म्हणाली की आधी सुरुवातीला आम्ही गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा विचार केला होता, परंतु लॉजिस्टिक आणि खूप लोकांमुळे सर्व व्यवस्था करणे खूप कठीण झाले असते. या कारणास्तव आम्ही कर्जतमध्ये विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.