IND vs BAN: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर रवाना झाली आहे. या दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबर रोजी होणार्या पहिल्या एकदिवसीय सामन्याने होईल. बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेशिवाय भारताला दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळायची आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर विश्रांती घेतल्यानंतर भारतीय वरिष्ठ खेळाडू या दौऱ्यावर पुनरागमन करत आहेत. बांगलादेश दौरा सुरू होण्यापूर्वी आता टीमचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) पुन्हा एकदा सुट्टीवर जाऊ शकतो, अशी बातमी येत आहे. बातमी अशी की, बांगलादेश दौऱ्यानंतर राहुलने बीसीसीआयकडे (BCCI) रजेची मागणी केली होती, ज्याला बोर्डाने मान्यता दिली आहे.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर केएल राहुल त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीसोबत लग्न करणार आहे, त्यामुळे त्याने ही सुट्टी घेतली असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी आणि राहुलने किती दिवसांची रजा मागितली आहे याबाबतही माहिती नाही. (हे देखील वाचा: बांगलादेशला रवाना होण्यापुर्वी Rohit Sharma ने मुंबई विमानतळावर पत्रकारांना विचारला मजेशीर प्रश्न, पहा व्हिडीओ)
बांगलादेश दौऱ्यानंतर, टीम इंडियाला जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितकी टी-20 मालिका खेळायची आहे. यादरम्यान राहुलने लग्न केले तर तो या दोन्ही मालिकांना मिस करू शकतो. भारताच्या बांगलादेश दौऱ्यानंतर केएल राहुल कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही संघांचा भाग आहे. या दौऱ्यातील पहिली कसोटी 4 डिसेंबरला खेळल्यानंतर भारताला 7 आणि 10 डिसेंबर रोजी उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत. 14 डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे.