Indian Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team, 2nd ODI 2024: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल. या मालिकेत टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचे नेतृत्व सोफी डिव्हाईन करत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 59 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड
टीम इंडिया आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यात आतापर्यंत एकूण 55 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 21 सामने जिंकले आहेत. तर, न्यूझीलंड संघाने 23 सामने जिंकले आहेत. दरम्यान, एकाही सामन्याचा निकाल लागलेला नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल. (हे देखील वाचा: IND vs SA T20I Series 2024 Schedule: पुढील महिन्यात 4 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला होणार रवाना, येथे पाहा पूर्ण वेळापत्रक)
कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दसऱ्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण Sports18 चॅनेलवर उपलब्ध असेल. जिओ सिनेमावर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून सामन्याचा आनंद घेता येईल.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
टीम इंडिया : यास्तिका भाटिया, उमा छेत्री (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेआय रॉड्रिग्स, शफाली वर्मा, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, राधा यादव, ए रेड्डी, रेणुका सिंग, श्रेयंका पाटील.
न्यूझीलंड : एमएल ग्रीन, आयसी गेज (विकेटकीपर), बीएम हॅलिडे, जॉर्जिया प्लिमर, एसडब्ल्यू बेट्स, एसी केर, एसएफएम डिव्हाईन (कर्णधार), ईडन कार्सन, एचएम रो, मॉली पेनफोल्ड, एलएमएम ताहुहू.