IND vs WI (Photo Credit - Twitter)

IND vs WI 5th T20: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात, टीम इंडियाने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आपले कौशल्य दाखवले आणि सामना 9 विकेट्सच्या मोठ्या फरकाने जिंकला. या विजयामुळे मालिका रोमांचक झाली आहे. सध्या दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत आहेत. दुसरीकडे, रविवारी अमेरिकेतील लॉडरहिल स्टेडियमवर शेवटचा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. (हे देखील वाचा: Shubman Gill - Yashasvi Jaiswal New Record: भारतीय सलामीवीरांचा मोठा कारनामा, गिल-जैस्वालने मोडला बाबर-रिझवानचा विश्वविक्रम)

कधी आणि कुठे पाहणार सामना?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळली जाणारी टी-20 पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामना 13 ऑगस्ट 2023 रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना अमेरिकेतील लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राऊंडवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. ही मालिका मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर पाहता येईल. तसेच मालिका डीडी स्पोर्ट्सवर टीव्हीवर पाहता येईल.

कोण कोणावर भारी?

भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघामध्ये आतापर्यंत 29 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 19 सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजने 9 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

पहा दोन्ही संघाचे खेळाडू

वेस्ट इंडिज संघ - रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काईल मेयर्स (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड , ओडियन स्मिथ, ओशाने थॉमस.

टीम इंडियाचा संघ – इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, सूर्य कुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.