India vs County XI: टीम इंडियामध्ये स्थान न मिळाल्याने Avesh Khan व Washington Sundar काउंटी संघाकडून मैदानात, पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर (Photo Credit: Instagram)

India vs County Select XI: इंग्लंडविरुद्ध (England) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ (Indian Team) डरहम येथे काउंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळत आहे. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे खेळत नसल्याने हंगामी कर्णधार रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करत आहे. या सराव सामन्यात एक अतिशय रोचक गोष्ट पाहायला मिळाली. वास्तविक भारतीय संघातील दोन खेळाडूंचा विरोधी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. काउंटी इलेव्हनच्या (County XI) संघात वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि आवेश खान (Avesh Khan) यांना संधी मिळाली आहे. या दोन्ही खेळाडूंना भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही, परंतु असे असूनही या दोन्ही खेळाडूंना संपूर्ण सामन्याचा सराव मिळणार आहे. (India vs County Select XI Live Streaming: भारत विरुद्ध काउंटी सिलेक्ट इलेव्हन पहिला सराव सामना, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?)

कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विन काउंटी इलेव्हन विरुद्ध सराव सामन्यात खेळत नसून सर्व खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.  विशेष म्हणजे भारतीय खेळाडू सुट्टीचा आनंद लुटत असताना अश्विन सरे काउंटी संघाकडून सराव सामन्यासाठी मैदानात उतरला. भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा रोहित कर्णधार असून मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, उमेश यादव या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच केएल राहुल विकेटकीपर म्हणून खेळत आहे. काउंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्ध कर्णधार बनलेला रोहित शर्मा या सामन्यात फ्लॉप ठरला. रोहितने 33 चेंडूत केवळ 9 धावा केल्या. सराव सामन्यात मयंक अग्रवालही अपयशी ठरला आणि त्याला 35 चेंडूत केवळ 28 धावा करता आल्या. दरम्यान, आवेश आणि सुंदरला विरोधी संघाकडून खेळताना पाहून नेटकरी देखील चकित झाले आणि त्यांनी अशाप्रकारे प्रतिक्रिया दिल्या.

आता खेळाडूंही उधार द्यायला लागलो... 

भारतीय व्यवस्थापनापुढे आवेश-वॉशिंग्टन 

मनोरंजक!

CSXI कॅप्टनला रोहीत शर्मा!

सुंदर-आवेश भारताविरुद्ध

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल सलामीला उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे कारण शुभमन गिल दुखापतीमुळे दौर्‍याबाहेर पडला आहे. दुसरीकडे, संघ व्यवस्थापन केएल राहुलला सलामीच्या जागेऐवजी मधल्या फळीत मैदानात उतरवण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे रोहित, मयंक आणि अन्य खेळाडूंसाठी लय मिळ्वण्याशी या सराव सामना उपयुक्त ठरू शकतो.