भारत (India)-वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात पावसाचे सावट असल्याचे वृत्त समोर आले आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध अंतिम टी-20 सामन्यातदेखील विजय मिळवत त्यांना क्लिन स्विप देण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. दोन्ही संघातील हा सामने रात्री 8 वाजता सुरु होईल. दरम्यान, भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयने गयानातीळ सध्याच्या हवामानाची माहिती दिली आहे. गुयानाच्या प्रोविडेंस स्टेडियममध्ये खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात सध्या मैदानावर काळे ढग दिसत आहे. त्यामुळे टॉस होण्यास थोडा वेळ लागू शकतो. (ICC Test Rankings: विराट कोहली याच्या No 1 रँकिंगला धोका, स्टीव्ह स्मिथ याची टेस्ट क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप)
भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिले दोन सामने अमेरिकेच्या फ्लोरिडा शहरात खेळवण्यात आले होते. दुसऱ्या टी-20 सामन्यात देखील पावसाने व्यत्यय घातला होता. त्यामुळे वेस्ट इंडिजला 15 ओव्हर फलंदाजी करता आली होती. पाऊस सातत्याने पडत असल्यामुळे डकवर्थ-लुईस नियमांनुसार या सामन्यात भारताला विजयी घोषित करण्यात आले होते.
Guyana under a cloud cover at the moment 🌧️🌧️
Let there be some sunshine ☀️ #WIvIND pic.twitter.com/C7r3HSLtvB
— BCCI (@BCCI) August 6, 2019
दुसरीकडे, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज, मंगळवारी पूर्ण दिवस गयानामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळपासून या परिसरात पाऊस पडत आहे. त्यामुळे सामना उशीरा सुरु होऊ शकतो. आणि जर पाऊस थांबला नाही तर भारत ही मालिका 2-0 ने जिंकेल. दरम्यान, भारताने मागील दोन्ही सामने जिंकल्याने तिसऱ्या सामन्यात युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी विश्रांती देऊन केएल राहुल आणि राहुल चहर याला संघात घेतले जाऊ शकते. तसेच ऋषभ पंत याच्या जागी श्रेयस अय्यर याला संघात स्थान मिळू शकते. पहिल्या दोन मॅचमध्ये चौथ्या क्रमांकावर पंतला संधी देण्यात आली होती. मात्र पंत काही संतोष जनक खेळी करण्यास अयशस्वी राहिला. त्यामुळं त्याच्या ऐवजी अय्यरला संधी मिळू शकते.