इंग्लंड (England) मध्ये चालू असलेल्या आयसीसी (ICC) विश्वकप मध्ये भारतीय संघ आज आपला साखळी सामन्यातील अंतिम सामना, श्रीलंका विरुद्ध, खेळण्यास सज्ज आहे. बांग्लादेशविरुद्ध मागील सामन्यात विजय मिळवत टीम इंडिया ने विश्वचषकाच्या सेमीफाइनलमध्ये धडक मारली. सेमिफायनलामध्ये प्रवेश केल्याने भारतीय संघाला थोडा दिलासा मिळाला आहे. भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) सामना इंग्लंडच्या हेडिंग्ले (Headingley) मध्ये खेळाला जाईल. भारत-श्रीलंकामधील सामना बघण्यासाठी हजारो प्रेक्षक हेडिंग्ले ला पोहचले आहे. जे चाहते इंग्लंड ला जाऊन हा सामना बघण्यात असमर्थ आहे ते टीव्ही वर DD Sports वर या सामन्याचा आनंद लुटू शकतात. दरम्यान, देशाचा बहुचर्चित रेडिओ चॅनेल प्रसार भरती स्पोर्ट्स (Prasar Bharti Sports) भारत-बांग्लादेश सामन्याची लाइव कमेंट्री करणार आहे. आपण प्रसार भारती च्या FM 106.40 मेगाहर्ट्ज वर जाऊन या सामन्याची कॉमेंटरी ऐकू शकतात. (IND vs SL मॅचमध्ये रोहित शर्मा याला रन-मशीन बनण्याची संधी; सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा च्या विश्वचषक रेकॉर्डवर 'हिटमॅन' ची नजर)
यंदाच्या आयसीसी विश्वचषकात भारतीय संघाने शानदान कामगिरी केली आहे. भारताने आपले 8 पैकी 6 सामने जिंकले असून 1 सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला. श्रीलंकाविरुद्ध सामन्यात भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होऊ शकतात. काही प्रमुख खेळाडूंना या सामन्यात विश्रांती मिळू शकते.
यंदाच्या विश्वकपमध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने यंदा विश्वचषकात सर्वाधिक शतकं ठोकली आहेत. विश्वचषकमध्ये शतक करण्यात रोहितने कर्णधार विराट कोहली ला मागे टाकले आहे. रोहितने 4 शतकं केली आहेत तर विराट सलग अर्धशतकं केली. विश्वचषकमध्ये सलग अर्धशतके करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.