India vs South Africa ICC World Cup 2019: दक्षिण आफ्रिका संघाचे टीम इंडिया समोर 228 धावांचे लक्ष्य
युजवेंद्र चहल (Photo Credits: Getty Images)

India vs South Africa ICC World Cup 2019: क्रिकेट विश्वचषक 2019 मधील भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेने 228 इतक्या धावांचे आव्हान दिले आहे. साउथम्प्टन येथील बाऊल क्रिकेट ग्राऊंड (Rose Bowl Cricket Ground) येथे पार पडत असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची सुरुवातच डळमळीत झाली. हा समना अटीतटीचा होईल, अशी आशा असतानाच भारतीय गोलंदाजांनी मैदानावर कमाल केली. खास करुन युजवेंद्र चहल याची जादू चालली.

सलामीला गेलेले फलंदाजच ढेपाळल्याने आफ्रिका संघाला लवकरच घरघर लागणार हे नक्की होतं. पण, आफ्रिका संघाच्या या कामगिरीला केवळ सलामी फलंदाजांची पडझड इतकेच कारण नाही. तर, नाणेफेक जिंकली असताना घेतलेला निर्णय हासुद्धा आफ्रिकेला भोवाला. आफ्रिकेने नाणेफेक जिंकली. त्यानंतर फलंदाजी की गोलंदाजी हा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले तरी, आफ्रिकेला हा निर्णय योग्य पद्धतीने घेता आला आही. आफ्रिका संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय पूर्ण फसला. (हेही वाचा, ICC World Cup 2019, India vs South Africa: कॉमेंट्रेटर चुकला, भारत नाणेफेक जिंकला, दक्षिण आफ्रिका क्षणभर अवाकच झाला!)

आफ्रिकेच्या प्रथम फलंदाजीच्या फसलेल्या निर्णयाचा पुरेपूर फायदा टीम इंडियाने उचलला. जसप्रीत बुमराहने हाशिम आमला आणि क्विंटन डी-कॉक यांना जेरबंद केले. या दोन विकेटनंतर बॅकफूटवर गेलेला आफ्रिका परत उभारुच शकला नाही. नाही म्हणालयाल कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि वॅन डर डसन यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, तो फारसा यशस्वी ठरला नाही.

युवराज चहल याची जादू जबरसदस्त चालली. त्याने डसन आणि डु प्लेसिस यांना थोड्या फरकाने तंबूत माघारी धाडले. त्यामुळे भारताचा दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा एकदा वरचष्मा राहिला. जे.पी.ड्युमिनी हा दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळिचा खेळाडू काहीतरी चमकदार कामगिरी दाखवले अशी अशा होती. पण, भारताच्या कुलदीप यादव याने पायचित करत ड्युमिनी यालाही तंबूत धाडले.

दरम्यान, फेलुक्वायो आणि ख्रिस मॉरिस यांनी सातव्या विकेटसाठी हलकीशी भागिदारी करत संघाची मजल 200 धावांचा टप्पा ओलांडण्यापर्यंत पोहोचवली.

भारताकडून युजवेंद्र चहलने ४ बळी घेतले. त्याला जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २-२ तर कुलदीप यादवने १ बळी घेत चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघासमोर 228 धावांचे लक्ष्य कसेबसे ठेवले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ

भारत: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार.

साउथ अफ्रीका: फाफ डु प्लेसिस डु प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), जे पी डुमिनी, डेविड मिलर, रासी वैन डेर डुसैन, कैगिसो रबाडा, तबरेज शम्सी, इमरान ताहिर, आंदिले फेहलुकवायो, क्रिस मॉरिस.