 
                                                                 IND vs PAK T20I Series: क्रिकेटमधील सर्वात मोठे प्रतिस्पर्ध्यांपैकी एक म्हणजे भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) हे आयसीसी (ICC) स्पर्धांमध्ये आणि एशिया कपमधील (Asia Cup) वैशिष्ट्य असू शकते परंतु दोन्ही बाजू लवकरच द्विपक्षीय मालिकेत आमने-सामने येऊ शकतात. दोन्ही देशातील क्रिकेट संघात यापूर्वी 2012-13 मध्ये अखेरची द्विपक्षीय मालिका खेळली गेली होती, परंतु त्यानंतर दोन्ही देशांमधील बिघडत चाललेल्या राजकीय संबंधांमुळे आयसीसी स्पर्धा वगळता दोन्ही संघात मालिका आयोजित केल्या गेल्या नाही. पाकिस्ताननी वृत्तपत्र जंगच्या (Jung) वृत्तानुसार, वर्षाखेरीस तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येऊ शकतात. वृत्तात पुढे म्हटल्यानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) भविष्यात एखादे प्रकरण तयार झाले की नाही हे विचारण्यास तयार आहे आणि छोट्या स्वरूपात खेळल्या जाणार्या तीन सामन्यांसाठी सहा दिवसांची विंडो मंजूर केली जाऊ शकते. (Asia Cup 2021: यंदा आशिया चषक आयोजित करण्यावर PCB चा संकोच, पहा काय आहे नक्की कारण)
मात्र पीसीबी आणि भारतीय बोर्ड यांच्यात कोणत्याही प्रकारचा संपर्क असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी मंगळवारी वृत्त नाकारत म्हटले. पीसीबीच्या सूत्रांनी सांगितले आहे की जर ही मालिका पुढे गेली तर पाकिस्तान दौर्यावर येणारी भारतीय टीमच असेल कारण शेवटच्या वेळी पाकिस्तान संघाने भारत दौरा केला होता. अलीकडील काळात दोन्ही संघ फक्त आयसीसी वर्ल्ड कप आणि आशिया कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. या स्पर्धांमध्ये हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये टीम इंडिया आघाडीवर आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघाने 17 पैकी 13 सामने जिंकले आहेत तसेच आशिया चषक स्पर्धेत संघाने 14 सामन्यांत 8 विजयांची नोंद केली आहे.
तथापि, दोन्ही संघांदरम्यान एकूणच हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये पाकिस्तान अग्रगणी आहे. 199 सामन्यांत (एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी) पाकिस्तानने भारताच्या 70 विजयांच्या तुलनेत 86 सामने जिंकले आहेत. मात्र, टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघ आघाडीवर असून संघाने आतापर्यंतच्या आठ सामन्यांमध्ये सहा विजयांची नोंद केली आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
