India vs New Zealand women's 2nd T20 2019: भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा दुसऱ्या T20 सामन्यामध्ये भारतीय महिला संघाचा दारुण पराभव झाला आहे. तर चार विकेटने भारतीय संघाला हरवत तीन सामन्यात T20 सीरिजमध्ये 2-0 अशा गुणांची संख्या झाली आहे. त्याचसोबत न्यूझीलंडच्या संघाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आजच्या सामन्यादरम्यान सूजी बेट्स हिने शानदार खेळी करत 62 धावा काढून अर्धशतक पूर्ण केले. तसेच बेट्स हिच्यासह कर्णधार एमी सैटर्थवेट हिने 23 धावा आणि सोफी डेविने 19 धावा काढत महत्वपूर्ण खेळी केली.
भारतीय महिला संघासाठी राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी सर्वाधिक अनुक्रमे 2-2 अशा विकेट्स घेतल्या. तर पुनम यादव आणि मनिषा जोशी यांनी अनुक्रमे 1-1 विकेट्स घेतल्या. (हेही वाचा-महाराष्ट्राची स्मृती मंधाना महिला क्रिकेटपटूंच्या ICC क्रमवारीत अव्वल)
यापूर्वी भारतीय संघाने नाणे फेक केल्यानंतर फलंदाजी करण्याचे ठरविले. तर निर्धारित ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या नुकसान सहन करत न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघासमोर 136 धावांचे आव्हान ठेवले. भारतीय संघाच्या सामन्याची सुरुवात प्रिया पूनिया आणि स्मृति मंधाना यांनी केली. पूनिया फक्त चार धावा काढच बाद झाली. तसेच मंधना 26 धावा काढत रोजमॅरीची शिकार बनत बाद झाली. भारतीय संघासाठी जेम्मिाह रोड्रिगेज हिने सर्वाधिक 72 धावांची शानदार खेळी केली.
मेहमान संघासाठी रोजमेरी माइरा सर्वात सफल गोलंदाज ठरली. माइरा हिने आपल्या चार ओव्हरच्या स्पेलमध्ये 17 धावा देत दोन जणांना बाद केले. माइरा हिच्या व्यतिरिक्त सोफी डेविने, एमेलिया केर, लेघ कास्परेक यांनी अनुक्रमे 1-1 विकेट्स घेतल्या आहेत.