Mahendra Singh Dhoni (Photo Credit-Getty)

India Vs New Zealand 5th ODI: विकेटकिपर महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) अनेकदा आपल्या गोलंदाजांना उपयुक्त सल्ले देत असतो. या सल्लांचा फायदा गोलंदाजांना नेहमीच होत आलाय. विकेटकिपिंगची धोनीची खास शैली आहे. या शैलीतून तो फलंदाजाविषयी काही अंदाज बांधतो आणि त्याप्रमाणे आपल्या गोलंदाजांना मार्गदर्शन करत असतो. विराटसेनेतील लकी चार्म असलेला मराठमोठा क्रिकेटर केदार जाधव (Kedar Jadhav) याला धोनीने चक्क मराठीतून मार्गदर्शन केले आहे.

केदार जाधवने न्युझीलंड विरुद्ध रंगलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केन विल्मसनची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. यामदरम्यान धोनीने केदारला मार्गदर्शन करताना "पुढे नको भाऊ... घेऊन टाक!" असा मराठीतून सल्ला दिला. तब्बल 52 वर्षांनी भारतीय संघाचा न्यूझीलंड मध्ये पहिल्यांदाच दणदणीत विजय

ऐकूया धोनीचे हे प्रेरणादायी मराठी बोल...

भारतीय संघाने दिलेले 253 धावांचे लक्ष्य न्युझीलंडला पूर्ण करता आले नाही आणि भारताचा 35 धावांनी विजय झाला. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने 4-1 अशी आघाडी घेत मालिका जिंकली.