
India vs New Zealand 4th ODI: न्युझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला. अवघ्या 92 धावांत टीम इंडिया माघारी परतल्याने न्युझीलंडपुढे अगदी सोपे आव्हान होते. दोन गडी गमावत न्युझीलंडने 93 धावांचे लक्ष्य साध्य केले आणि 8 गडी राखत भारतावर विजय मिळवला.
टॉस हारल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. मात्र भारताची सुरुवातच अडखळत झाली. त्यानंतर टीम इंडियाची पडझड सतत सुरु राहिली. न्युझीलंडच्या गोलंदाजीपुढे 100 धावा करणे देखील भारतीय संघाला जमले नाही.
पाच सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत भारताने पहिले तीन सामने जिंकले असून न्युझीलंडचा हा पहिलाच विजय आहे.
सध्या विराट कोहलीला विश्रांती दिल्याने रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली न्युझीलंड मालिकेतील हा पहिलाच सामना होता.