
India vs New Zealand 4th ODI: न्युझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील चौथा सामना आज सेडॉन पार्क मैदानावर रंगला. नाणेफेक जिंकत न्युझीलंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्युझीलंडच्या तगड्या गोलंदाजीपुढे भारतीय संघाने चक्क लोळण घातले. अवघ्या 92 धावांत भारताचे सर्व गडी माघारी पाठवण्यात न्युझीलंडला यश आले.
मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत भारताने न्युझीलंडला जबर धक्का दिला होता. त्यालाच उत्तर देण्यासाठी न्युझीलंडने ही दमदार खेळी केल्याचे दिसत आहे. सध्या कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली असून रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धूरा आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली न्युझीलंड दौऱ्यातील हा पहिलाच सामना असून त्यातच टीम इंडियाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. (तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा न्युझीलंडवर 7 विकेट्सनी दणदणीत विजय, मालिकेत 3-0 चं वर्चस्व)
रोहित शर्मा 7 धावांवर बाद झाला तर 20 धावांत धवन माघारी परतला. शुभमन गिल (9), अंबाती रायडू (0), दिनेश कार्तिक (0), केदार जाधव (1), हार्दिक पांड्या (16), भुवनेश्वर कुमार (1), कुलदीप यादव (15), खलील अहमद (5), युजवेंद्र चहल (18) यांनी इतक्या धावांचे योगदान दिले.