आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये आज टीम इंडिया ची लढत यजमान इंग्लंड (England) विरुद्ध होणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इऑन मॉर्गन ने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात एक-एक बदल करण्यात आला आहे. टीम इंडिया ने अष्टपैलू विजय शंकर ला बाहेर काढत, यंग रिषभ पंत (Rishabh Pant) ला संधी दिली आहे. दुरीकडे, इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy) संघात परतला आहे. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ नव्या जर्सीत खेळणार आहे. ही मॅच एजबस्टन येथे खेळण्यात येणार आहे. (India vs England Live Cricket Streaming on DD Sports and Prasar Bharati Sports for Free: रेडिओ वर लुटा IND vs ENG मॅच चा LIVE आनंद)

या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहचेल. या याउलट इंग्लंडची स्तिथी काहीशी बिकट आहे. इंग्लंडने शेवटचे दोन सामने गमवले आहेत. त्यामुळे सेमीफायनलच्या दृष्टीने त्यांच्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. यंदा विश्वकप जिंकण्यासाठी इंग्लंड सर्वात फेव्हरेट होता. इंग्लंड संघाने दमदार मात्र, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाने संघ अडचणीत आला आहे. पहिल्या 5 पैकी 4 सामन्यात त्यांनी विजय मिळवला होता.

सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी इंग्लंडला आपले शिल्लक दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. पण इंग्लंडचा प्रवास इतका सोप्पा नसणार आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी इंग्लंडबरोबर पाकिस्तान टीमही शर्यतीत आहे. भारताविरुद्ध मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव झाला तर याचा थेट फायदा पाकिस्तानला होऊ शकतो.

टीम इंडिया: रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली (कॅप्टन), केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, रिषभ पंत, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

टीम इंग्लंड: इऑन मॉर्गन (कॅप्टन), जो रूट, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर), आदिल रशीद, ख्रिस वोअक्स, जोफ्रा आर्चर, मार्क वूड, लिअम प्लंकेट.