IND vs ENG Test Series 2021: इंग्लंडचा पुढील वर्षी होणार भारत दौरा आयोजित करण्यास श्रीलंका उत्सुक, पाहा काय म्हणाले BCCI अधिकारी
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: Getty)

श्रीलंका क्रिकेटने (Sri Lanka Cricket) बीसीसीआयच्या (BCCI) पुढील वर्षीच्या इंग्लंडविरुद्ध (England) कसोटी मालिकेचे आयोजन करण्याची तयारी दर्शविली आहे. अहवालानुसार भारतात कोविड-19 (India COVID-19) स्थिती लक्षात घेता मालिका खेळणे शक्य न झाल्यास श्रीलंका येथे मालिका आयोजित करण्यासाठी श्रीलंका बोर्डाने इच्छा (SLC) दर्शवली आहे. भारतात कोरोना व्हायरस प्रकरणांची संख्या वाढत आहे. यानंतर बीसीसीआयने यंदा युएईमध्ये इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आयोजित करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने इंग्लंडने पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे आणि ‘द आईलैंड’ मधील वृत्तानुसार, एसएलसी स्पर्धेत यजमान म्हणून खेळण्यासाठी इच्छुक आहे. भारतविरुद्ध मालिका खेळण्यासाठी पुढील वर्षी जानेवारीत इंग्लंड श्रीलंका येथे झालेल्या दोन कसोटी सामन्यांनंतर राहण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे. (England Tour of India: यंदाचा इंग्लंडचा भारत दौरा 2021 पर्यंत स्थगित; सप्टेंबर महिन्यात होणार होती वनडे आणि टी-20 मालिका)

यावर्षी मार्च महिन्यात स्थगित करण्यात आलेली मालिका संपवण्यासाठी इंग्लंड जानेवारी महिन्यात पुन्हा श्रीलंकेत परत येणार आहे. “श्रीलंकेतील दोन कसोटी सामन्यांनंतर इंग्लंडचा संघ भारतविरुद्ध मालिका पूर्ण करण्यासाठी थांबण्याची शक्यता एसएलसीने सुचवल्यानंतर विचारात घेण्यात आली आहे,” अहवालात म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात एसएलसीतर्फे कोणताही औपचारिक प्रस्ताव पाठवल्याचे ऐकले नसल्याचे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने PTIला सांगितले. “या टप्प्यावर बीसीसीआय अशा प्रस्तावाचे मनोरंजन करीत नाही कारण अजून चार महिने बाकी आहेत,” अधिकार्यें सांगितले.

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीसाठी इंग्लंडने कोलंबोमध्ये दोन आठवडे घालवले होते परंतु जागतिक आरोग्याच्या संकटामुळे सराव सामन्यादरम्यान त्यांना मायदेशी परत माघारी जावे लागले. भारतात व्हायरसमुळे इंग्लंडचा सप्टेंबरमध्ये मर्यादित षटकांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, तर बीसीसीआयला आयपीएलही बाहेर युएईमध्ये हलवावे लागले. श्रीलंकेमध्ये कोरोनाची परिस्थिती भारतापेक्षा चांगली आहे आणि या आठवड्याच्या सुरूवातीला शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. एसएलसीने या महिन्यात लंकन प्रिमियर लीगचे आयोजन नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्यात आले आहे.