England Tour of India: यंदाचा इंग्लंडचा भारत दौरा 2021 पर्यंत स्थगित; सप्टेंबर महिन्यात होणार होती वनडे आणि टी-20 मालिका
भारत-इंग्लंड (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) रद्द किंवा पुढे ढकलण्यात येणाऱ्या क्रिकेट मालिकांमध्ये वाढ झाली आहे. टीम इंडियाचा (Team India) झिम्बाब्वे, श्रीलंका दौरा, त्यानंतर आयपीएलला युएईमध्ये हलवावे लागले आणि आता भारतात कोविड-19 (COVID-19) च्या वाढत्या प्रभावामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार इंग्लंडचा भारत दौराही (England Tour of India) 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याची खातरजमा केली. भारत-इंग्लंडमधील मर्यादित ओव्हरची मालिका आता 2021 च्या सुरूवातीस होईल असे बीसीसीआयने सांगितले. दरम्यान, इंग्लंडला भारत दौर्‍यावर टेस्ट चँपियनशिप अंतर्गत 5 सामन्यांची मालिका खेळायची आहे. पुढील वर्षी वनडे, टी-20 आणि कसोटी मालिकेच्या वेळापत्रकांसंदर्भात सध्या दोन्ही बोर्डांमध्ये चर्चा सुरू आहे. ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले की "कोरोनामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर मधील टी-20 विश्वचषक यापूर्वी स्थगित करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या महामारी दरम्यान आम्हाला दुसर्‍या मंडळासह मालिका पुन्हा शेड्यूल करण्याची आवश्यकता होती. याक्षणी बीसीसीआय आणि ईसीबीने परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली आहे." (ENG vs IRE 3rd ODI: आयर्लंडने तिसर्‍या वनडे सामन्यात इंग्लंडविरुद्ध 7 विकेटने मिळवला शानदार विजय, मोडला टीम इंडियाचा 18 वर्ष जुना रेकॉर्ड)

बीसीसीआयने म्हटले की दोन्ही क्रिकेट बोर्ड जानेवारी ते मार्च 2021 या कालावधीत टी-20, टेस्ट आणि वनडे मालिकेचा संपूर्ण दौरा करण्यावर चर्चा करीत आहेत. यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) वेस्ट इंडीजविरुद्ध ऑक्टोबरमध्ये होणारी देशांतर्गत टी-20 मालिका देखील पुढे ढकलली होती. त्याचबरोबर मागील महिन्यात दक्षिण आफ्रिकेने सप्टेंबरमध्ये होणारा वेस्ट इंडीजचा दौराही पुढे ढकलला होता. दोन्ही संघात 2 टेस्ट आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार होते. दुसरीकडे, बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले. आयपीएल सुरुवातीला व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आले होते परंतु टी-20 विश्वचषक पुढे ढकलल्यामुळे बीसीसीआयला टी-20 लीग होस्ट करण्यासाठी एक विंडो मिळाली.

दरम्यान, 2021 मध्ये इंग्लंड जानेवारीच्या शेवटी ते मार्च दरम्यान 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौर्‍यावर येणार आहे आणि दोन्ही टीम उपलब्ध उतरल्यास कसोटीसह मर्यादित ओव्हरची मालिका खेळतील असे दिसत आहे. 2021 च्या उन्हाळ्यात इंग्लंडच्या भारत दौर्‍याची कसोटी पुष्टी करण्यासाठी इंग्लंडशी चर्चा सुरू असल्याचेही बीसीसीआयने म्हटले आहे.