Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team T20 Head To Head: भारतीय संघ आणि बांगलादेश संघ (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ग्वाल्हेरच्या नवीन माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर तब्बल 14 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. बांगलादेशचा कसोटी मालिकेत 2-0 असा धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघाची नजर आता टी-20 मालिकेवर आहे. टीम इंडियाच्या संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. कर्णधार झाल्यानंतर सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. अशा स्थितीत सूर्याला विजयाची पताका फडकवायची आहे. (हेही वाचा:India vs Bangladesh 1st T20 Pitch Report: ग्वाल्हेरच्या मैदानावर कोणाचे असणार वर्चस्व, गोलंदाज की फलंदाज? येथे जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल )
दुसरीकडे, बांगलादेश संघाला टी-20 मध्ये भारतीय संघाला कडवी टक्कर द्यायची आहे. दोन्ही संघांची शेवटची गाठ 2024 च्या टी 20 विश्वचषकात झाली होती. जिथे भारताने बांगलादेशचा ५० धावांनी पराभव केला. एकूणच, भारत आणि बांगलादेश यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 14 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारताने 13 सामने जिंकले असून एकात पराभव झाला आहे.
दोन्ही संघांमधील हेड टू हेड आकडेवारी
टी 20 मध्ये भारत आणि बांगलादेश आतापर्यंत 14 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने 13 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला केवळ एकच विजय मिळाला आहे. दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाचा वरचष्मा दिसतो. भारताने पाचही सामन्यांमध्ये बांगलादेशचा पराभव केला आहे. आशिया कप 2024 मध्ये हे दोन्ही संघ शेवटचे आमनेसामने आले होते. जिथे भारताने बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट गमावून 196 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावून 146 धावाच करू शकला.
दोन्ही संघांची पथके
भारतीय क्रिकेट संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव
बांगलादेश क्रिकेट संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झीद हसन तमीम, परवेझ हुसेन आमोन, तौहीद हृदोय, महमूद उल्ला, लिटन दास, जाकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शोरी. इस्लाम, तंजीम हसन साकीब, रकीबुल हसन