India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (IND vs BAN T20I Series 2024) पहिला सामना आज 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामनाग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल. 28 सप्टेंबर रोजी बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) खांद्यावर आहे. त्याचबरोबर नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) बांगलादेशचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
खेळपट्टीचा अहवाल
ग्वाल्हेरमधील माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी लाल मातीची आहे. या खेळपट्टीवर चांगली उसळी आणि वेग आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांना मदत मिळणे अपेक्षित आहे. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात होणारा पहिला टी-20 सामना हा उच्च स्कोअरिंग सामना असेल अशी अपेक्षा आहे. मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरली आहे. ग्वाल्हेरमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो. या मैदानावर वनडेत सरासरी 268 धावा आहेत. खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली आहे, जी लक्ष्याचा पाठलाग करताना फायदेशीर ठरू शकते.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रायन पराग, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
बांगलादेश : लिटन दास (यष्टीरक्षक), तनजीद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदोय, महमुदुल्ला, झेकर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब.