India Vs Australia 2nd T20I :  पावसामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Photo Credit: Twitter)

IND vs AUS 2nd T20I : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा मेलबर्नमध्ये सुरु असलेला दुसरा T-20 सामना अखेर पावसामुळे रद्द झाला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने 19 षटकात 7 बाद 132 धावा केल्या होत्या. मात्र सलग दुसऱ्या सामन्यातही पावसाचा अडथळा आल्याने तो मध्येच थांबवण्यात आला. भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार 19  षटकात 137 धावांचे आव्हान देण्यात आले होते पण पावसामुळे ते कमी करून 11 षटकात 90 धावांचे देण्यात आले.परंतू सतत पडणाऱ्या पावसामुळे अखेर सामना रद्द करावा लागला आहे.

दुसऱ्या T-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरूवातही डगमगीत झाली होती. पहिल्या मॅचप्रमाणेच आक्रमक फटकेबाजीत सुरुवात करणाऱ्या ख्रिस लिनला अवघ्या 13 धावांमध्ये आउट करण्यात आलं होत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर 4धावांनी विजय मिळवला होता.ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला  3 T-20, 4 टेस्ट आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळायची आहे. या खडतर दौऱ्याची सुरुवातT-20 सीरिजनं होणार आहे. ऑस्ट्रेलियातील मागील दौऱ्यात भारताने ऑस्ट्रेलियाला T-20 मध्ये त्यांच्याच भूमीत 3-0 नं नमवण्याची किमया केली होती.