India vs Australia (Photo Credits: PTI)

नुकत्याच सुरु झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पहिल्या वनडे (ODI) सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 66 धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या या मालिकेमध्ये पहिला सामना भारताने गमावल्यामुळे मालिका वाचवण्यासाठी पुढील सामना भारताला जिंकणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि अरॉन फ्रिंच (Aaron Finch) यांनी पहिल्या सामन्यात दमदार खेळी करत ऑस्ट्रेलियाला भक्कम सुरुवात करुन दिली. त्याचप्रमाणे स्टिव्हन स्मिथ (Steve Smit) याने देखील शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला 374 धावांच्या डोंगरावर पोहचवले. त्यामुळेच उद्या होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला या तिघांनाही लवकर बाद करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया उद्याच्या सामन्याच्या काही खास गोष्टी:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हेड-टू-हेड:

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकमेकांविरुद्ध 141 वनडे सामने खेळले असून 79 सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असून 52 सामने भारताने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये यापैकी 52 सामने झाले असून त्यात भारताला केवळ 13 सामन्यात विजय मिळवता आला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2nd वनडे कि प्लेअर्स:

भारतीय टीममधील शिखर धवन आणि जसप्रीत बुमराह हे दुसऱ्या वनडे साठी खूप महत्त्वाचे खेळाडू ठरु शकतात. तर ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने स्टिव स्मिथ आणि जॉश हेझलव्हूड हे कि प्लेअर्स ठरु शकतात.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2nd वनडे व्हेन्यू:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चा दुसरा सामना देखील सीडनी क्रिकेट ग्राऊंडवरच खेळला जाईल. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही 50% प्रेक्षकांची उपस्थिती असणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना वेळ:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी वनडे ही डे-नाईट असणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी 9.10 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर ऑस्ट्रेलियन वेळेनुसार दुपारी 2.40 ला हा सामना सुरु होईल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2nd वनडे लाईव्ह टेलिकास्ट:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2nd वनडे चा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही सोनी 6, सोनी टेन 1, सोनी टेन 3 या चॅनलवर पाहू शकता. त्याचप्रमाणे सोनीच्या OTT प्लॅटफॉर्म SonyLiv वरही तुम्ही पाहू शकता.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2nd वनडे प्लेईंग 11:

भारताच्या प्लेईंग 11 मध्ये युजवेंद्र चहल ऐवजी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. तर इतर टीम बदलण्याची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग 11 मध्ये मार्कस स्टायनिस ऐवजी कामरुन ग्रिन याला घेण्याची शक्यता आहे. बाकी ऑस्ट्रेलिया टीममध्ये बदल होण्याची शक्यता नाही. ('Butta Bomma' गाण्यावर मैदानावरच थिरकाला डेविड वॉर्नर, पाहून उत्साहित चाहत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया, पहा मजेदार Video)

उद्याचा सामना जिंकून मालिका आपल्या खिशात घालण्याचा ऑस्ट्रेलिया संघाचा मानस असेल. भारताने उद्याचा सामना जिंकल्यास मालिका 1-1 बरोबर होऊन अंतिम वनडे सामन्याची उत्सुकता अधिक वाढेल.