India Vs Australia 3rd ODI: ऑस्ट्रेलियातील भारताच्या ऐतिहासिक विजयावर खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव, पहा वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग यांचे ट्विट!
टीम इंडिया (Photo Credit: Facebook)

India Vs Australia 3rd ODI: भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा यंदा सफल ठरला आहे. कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिका जिंकत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत हा सामना भारताने 7 विकेट्स राखून जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 231 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) समान्यात सहा बळी घेत विक्रम रचला आहे तर फलंदाजीमध्ये महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) सलग तिसरं अर्धशतक झळकवत 87 धावांवर नाबाद खेळताना भारताला तिसरा एकदिवसीय सामना जिंकून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. India Vs Australia 3rd ODI: 7 विकेट्स राखत भारताचा ऐतिहासिक मालिका विजय

कसोटी पाठोपाठ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीवर भारतीय क्रिकेट चाहते, माजी खेळांडूंकडून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पहा खेळाडूंच्या ट्विटर रिअ‍ॅक्शन्स

 

 

 

महेंद्र सिंह धोनी  'मॅन ऑफ द सीरीज' आणि युजवेंद्र चहल  'मॅन ऑफ द मॅच' ठरला आहे.