IND vs AUS 2nd Test Match : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया फलंदाजीसाठी मैदानात
एरॉन फिंच: (Photo Credit: Getty Image)

IND vs AUS 2nd Test Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या स्टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाला सहाजिकच गोलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाचे सलामिवीर फलंदाज एरॉन फिंच आणि मार्कस हॅरिस मैदानात उतरले आहेत. दरम्यान, सध्यास्थितीत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 षटकं कोणत्याही नुकसानाशिाय 9 धावांवर आहे. फिंच 9 आणि रॅरीस 0वर खेळत आहेत.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उत्कृष्ठ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाला जखडून मर्यादित धावसंख्येत डाव अटोपणे हे भारतासमोरील मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, दुसऱ्या सामन्यादरम्यान भारतीय संघातही काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, आर अश्वीनच्या जागी उमेश यादव, तर, रोहित शर्माच्या जागी हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. अश्विन आणि रोहित जखमी असल्यामुळे संघाच्या बाहेर गेले आहेत. (हेही वाचा, दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, आर. अश्विन आणि रोहित शर्मा संघाबाहेर)

ऑस्ट्रेलिया संघ : टिम पेन (कर्णधार/विकेटकीपर), एरॉन फिंच, मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, मिशेल स्टॉर्क, पॅट कमिंस, नाथन लॉयन आणि जोश हेजलवुड

भारतीय संघ: विराट कोहली (कप्तान), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कप्तान), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव